शिवसेना प्रणित युवासेना,युवती सेनेत युवक व युवतींचा जल्लोषात पक्ष प्रवेश.
वर्धा : स्थानिक वर्धा येथील विश्रामगृहात युवासेना व युवती सेना आढावा बैठकीत युवती सेनेच्या विदर्भ निरीक्षक तथा राज्य कार्यकारणी सदस्य नामदार दामिनी संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत.शनिवार दिनांक २० जानेवारी रोजी अनेक युवक व युवतींचा युवासेना व युवती सेनेत भव्य जाहीर पक्षप्रवेश करण्यात आला.
यावेळी युवासेना वर्धा,आर्वी विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख निखिल सातपुते व देवळी, हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख मंगेश रावेकर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी सर्वानुमते वर्धा लोकसभा प्रमुख निलेश राऊत, वर्धा – सेलू उपजिल्हाप्रमुख स्वप्निल डांगट, आर्वी – आष्टी उपजिल्हाप्रमुख सुरज पिटेकर, वर्धा तालुका प्रमुख सचिन घोडमारे, सेलू तालुका प्रमुख अभिषेक सोनवणे, उपतालुका प्रमुख रंजीत भोसले,वर्धा शहर प्रमुख चेतन ढाकरे,वर्धा उपशहर प्रमुख प्रणय रोडे यांच्या नियुक्तीच्या शिफारस पत्र जिल्हाप्रमुखाच्या माध्यमातून पक्ष वरिष्ठांना पाठवण्यात आले.लवकरच पक्षश्रेष्ठीतर्फे पडताळणी करून नियुक्तीपत्र पाठवण्यात येतील त्यावेळी जिल्हाप्रमुखांच्या शुभहस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.
सदर बैठकीला व पक्षप्रवेशा प्रसंगी युवा सेनेत वैभव उपम, प्रदीप वाघाडे, कृणाल कुंबरे, जनार्दन तीमांडे, स्वप्निल रावेकर, सुमित उसरे, राहुल हुकरे, स्वप्निल डयुटे, गजू ठोंबरे, गणेश घुरवे, गणेश पाटमासे, सुमित ठाकूर, आकाश कोसरे, सागर यादव, तेजस उमाटे, रोशन भलावी, श्याम बानते, कुणाल ईखार, जग्गू रोकडे, प्रवीण महल्ले, स्वप्निल तितिरमारे तर युवती सेनेत कल्याणी भोंगाडे, पूजा गोसटकर, तनिषा शिंदे, आकांक्षा घागी, अस्मिता उरकुडे, वाणी साहू, साक्षी शेंडे, नेहा गोल्हर, मानसी गोमासे, मेघना केवटे, समीक्षा राऊत, प्राची आत्राम, पलक लक्षणे, त्रिशा थुल, ऋतुजा जोगे, नंदिनी ऊईके, तन्वी कांबळे अशे अनेक युवक व युवती मोठ्या संख्येत उपस्थित होते.
सर्व युवा व युवती सैनिकांना शिवसेना पक्ष वाढवने, संघटन बांधणी, पुढील लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी, युवक व युवतींच्या समस्या चे निराकरण करणे, जनतेची सेवा करीत समाजकार्यातून राजकारणाकडे वाटचाल करने अशा अनेक विषयावर मान्यवरा सोबत चर्चा व मार्गदर्शन देण्यात आले.
गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज/24 वर्धा