आष्टी शहीद -/ येथील बारिपूरा भागात राहणारी नीता तुळशीराम गुजर वय ४५यां महिलेले १५ जुलै रोजी आष्टी शेत शिवारात असलेल्या स्वतः च्या असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.यां घटनेमुळे आष्टी शहरात एकच खळबळ उडाली.
सविस्तर असें कि,
आष्टी शहरातील बारीपुरा भागात कु. नीता तुळशीराम गुजर वय ४५ही एकटीच राहत होती. वडिलांच्या नावे असलेली शेती भाड्याने देऊन व रोज मजुरी, बचत गटाचे काम करून आपली स्वतःची गुजरान करित राहत होती.आई वडील जिवंत असताना तिचे लग्न नागपूर येथे एका मुलासोबत झाले होते. वर्षभरात ती पतीपासून विभक्त झाली आणि आई वडिलांकडे राहू लागली. आई आणि वडील ही मरण पावले आणि एकटीच राहत होती. रोज मजुरी करून तर काही वेळ बचत गटाचे काम करून मिळेल त्या पैशात तिची गुजरान सुरु होती. अशातच तिच्या सोबत वाद सुरु झाला त्या वादाची तक्रार तिने आष्टी पोलिसांना दिली होती. केलेल्या तक्रारीचा तिला न्याय मिळाला नाही यां विवनचनेतून तिला आर्थिक चन चन जाणवू लागली होती. शेवटी तिने १५ जुलै रोजी स्वतः चे शेतात जाऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. नीता चा चुलत भाऊ हा विहिरीजवळून पुढील शेतात जात होता. त्याला विहिरीच्या काठावर ओढणी दिसली ही ओढणी येथे कशी आली म्हणून तो विहिरीत डोकावून पाहू लागला पाहतो तर काय एका महिलेचा मूतदेह तरंगताना दिसत होता. चुलत भावाने यां घटनेची माहिती नातेवाईक यांना दिली आणि नातेवाईक यांनी पाहणी केल्यावर पोलिसांना यां घटनेची माहिती दिली. पोलीस घटना स्तळी पोहचले आणि नातेवाईक याच्या मदतीने मूतदेह बाहेर काढून ओळख पटविली. पंचनामा करून तिचा मूतदेह खाजगी वाहणाने आष्टी ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले तेव्हा डॉ. यांनी तपसणी करून मूत घोषित केलें. उत्तरीय तपासणी साठी कारंजा (घा.)ग्रामीण रुग्णालय येथे नेण्याची व्यवस्था करण्यात आली. यां घटनेची आष्टी पोलिसात नोंद करण्यात आली असून ठाणेदार सुनिलसिंग पवार यांच्या मार्गदर्शन मध्ये पोलीस उपनिरीक्षक राजेश उंदीरवाडे पुढील तपास करित आहॆ.