सागर येथे वीर मरण पावलेल्या हुतात्मा जवान यांचे करडी ( धाड) येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार 

0

🔥सागर येथे वीर मरण पावलेल्या हुतात्मा जवान यांचे करडी ( धाड) येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार.

बुलढाणा -/ रक्षण करताना बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील करडी गावच्या एका वीर सुपुत्राने आपले सर्वोच्च बलिदान दिले आहे. भारतीय सैन्यात कार्यरत असलेले महार रेजीमेंटचे शूर जवान फौजी रमेश रामधन थोरात (वय ४४ वर्ष) यांना सागर कॅम्प येथे देशसेवा बजावत असताना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण जिल्ह्यासह करडी गावावर शोककळा पसरली आहे. कर्तव्य बजावताना वीरमरण स्व. रमेश थोरात हे भारतीय सैन्यात अत्यंत निष्ठेने आपली सेवा बजावत होते. ‘सागर कॅम्प’ येथे तैनात असताना त्यांना वीरमरण आले. वयाच्या ४४ व्या वर्षी त्यांनी भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुतीदिली. त्यांच्या शौर्याचा आणि असीम देशभक्तीचा संपूर्ण परिसराला अभिमान असून, त्यांच्या जाण्याने भारतीय सैन्याची आणि थोरात कुटुंबाची मोठी हानी झाली आहे.

अंत्यविधी हुतात्मा जवान रमेश थोरात यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी करडी येथे आणण्यात आले. . त्यांचा अंत्यविधी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान करडी (धाड)येथे शासकीय इतमामात पार पडला महार रेजीमेंटचे सुभेदार हजर होते . आहे. यावेळी प्रशासकीय अधिकारी,

लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या वीर पुत्राला अखेरचा निरोप दिला.

परिसराकडून मानाचा मुजरा या वीर सुपुत्राच्या बलिदानाला संपूर्ण परिसराच्या वतीने मानाचा मुजरा अर्पण करण्यात येत आहे. “त्यांचे शौर्य, देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठा सदैव तरुणांसाठी प्रेरणादायी राहील,” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि थोरात परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, अशी प्रार्थना सर्व स्तरातून केली जात आहे.मृतक सैनिकाला आई,वडिल,पत्नी एक मुलगा,एक मुलगी दोन भाऊ असा परिवार आहे. धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त होता.

          ब्युरो रिपोर्ट साहसिक              News-24 बुलढाणा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!