राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या भोंगळ कारभारामुळे एल एल बी परीक्षेच्या निकालात गोंधळ.

0

🔥राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या भोंगळ कारभारामुळे एल एल बी परीक्षेच्या निकालात गोंधळ.🔥नागपूर विद्यापीठाचा भोंगळ कारभार एलएलबी परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल न देता त्याच नंबर वर मागच्या वर्षी पास झालेले विद्यार्थ्यांचा निकाल दिला.

 वर्धा -/ यशवंत महाविद्यालय वर्धा च्या एलएलबी (NEP) सेकंड सेमिस्टर चा विद्यार्थी अमित मंगलराव लुंगे हा हिवाळी परीक्षा 2025 ला दोन विषयाकरिता परीक्षेकरिता रोल नंबर 342238 या रोल नंबर वर इंद्रप्रस्थ कॉलेज नलवाडी वर्धा सेंटर नंबर 665 येथे constitutional law -ll Law of contract- ll करिता परीक्षा दिली होती 09/04 / 2026 रोजी विद्यापीठाचा निकाल विद्यापीठाचा निकाल विद्यापीठाचा निकाल लागला असता ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्याचा निकाल कुठेच दिसत नसून 432238 या नंबर वर कुणाल देवराव चोपडे या विद्यार्थ्यांचा निकाल दिसत आहे परंतु महत्त्वाची बाब म्हणजे कुणाल देवराव चोपडे हा विद्यार्थी उन्हाळी परीक्षा 2025 ला रोल नंबर 218537 या नंबर वर पहिलेच पास झालेला आहे, हा विद्यार्थी जर पहिलेच पूर्णपणे पास झाला असून सर्व विषयात तर हा विद्यार्थी हिवाळी परीक्षा 2025 सप्लीमेंट्री ला कसा बसेल या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलीच नाही तर हिवाळी परीक्षा 2025 ला त्याचा निकाल कसा येऊ शकतो ही मोठी विद्यापीठाची घोर चूक आहे त्यामुळे अमित मंगल लुंगे या विद्यार्थ्यांचा निकाल दिसत नसून हा विद्यार्थी उत्तीर्ण आहे की अनुत्तीर्ण कसं समजायचं तर त्याचा निकालच विद्यापीठाने दिलेला नाही जर हा विद्यार्थी जर अनुत्तीर्ण झाला तर तो पुन्हा सप्लीमेंट्री परीक्षा देण्याचा त्याचा अधिकार आहे परंतु परीक्षा फॉर्म भरण्याची वेळ गेली आहे आणि रिव्होल्यूशनची सुद्धा वेळ गेली आहे त्यामुळे अमित मंगल लुंगे या विद्यार्थ्याला परीक्षेपासून मुकावे लागणार आहे त्यामुळे या विद्यार्थ्यावर खूप मोठा विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे शैक्षणिक खूप मोठा अन्याय झालेला आहे . विद्यार्थ्यांनी ही बाब आपल्या महाविद्यालयाला सुद्धा ही लक्षात आणून दिलेली आहे महाविद्यालयाने संबंधित विद्यापीठाचे विभागाशी पत्रव्यवहार सुद्धा केला आहे तसेच, विद्यार्थी स्वतः विद्यापीठात जाऊन पत्रव्यवहार केला परंतु विद्यापीठ काही गंभीर दखल घेत नाही त्यामुळे विद्यार्थ्यावर शैक्षणिक नुकसान झाल्यामुळे मानसिक त्रास होत आहे.(क्रमशः)

            ब्युरो रिपोर्ट साहसिक       News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!