साहेब काहीतरी करा ‘हो’ यांचे…! वर्ध्यात पोळ्याच्या दिवशी दारू विक्रेत्यांने केला सामान्य नागरिकांवर ‘फायटरने’ हल्ला
Byसाहसिक न्यूज24
प्रतिनिधी/ पवनार :
सद्या पवनारात दारू विक्रेत्यांनी कहरच केला असून आता सामान्य नागरिकावर सुद्धा हल्ले करायला हे मागेपुढे पाहत नाही. गावातील मुख्य चौक म्हणून बाजार चौक ओळखल्या जाते. याच चौकात जीवनावश्यक सर्वच वस्तू मिळतात त्यामुळे येथे सतत गर्दी असते, त्यातही रोजचा भाजी बाजार सुधा येथेच असल्याने महिला, मुली यांची सुद्धा वर्दळ असते मात्र , याच चौकात खुलेआम देशी विदेशी, गावठी मोहा दारूची विक्री सुरू आहे. दारू पिऊन दारुडे अश्लील भाषेत शिवीगाळ करतात. ज्या महिलांना ऐकवल्या सुधा जात नाहीत. आणि कोणी जर यांना हटकले तर दारू विक्रेते हे त्याच्यावर थेट हमला करतात. त्यातही दारू विक्रेत्यांचे दोन, तीन गट असून त्यांच्या माध्यमातून खुलेआम दारू विकल्या जात आहे. बाजार चौकात मागील २ महिन्यात सामान्य नागरिकांवर ८ वेळा हमले करण्यात आले. परंतु त्यांच्या भीतीने कोणीच तक्रार करायला समोर येत नाही.आणि ज्यांनी तक्रार केली त्यांना पुन्हा मारहाण केल्या जात असल्यानं सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. तान्ह्या पोळ्याच्या दिवशी झालेल्या हल्ल्यात विक्की वाढवे यांच्यावर फायटर ने हल्ला करण्यात आला, यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला यात त्याच्या अंगावरील संपूर्ण कपडे पूर्णपणे रक्ताने भिजले असताना, सेवाग्राम पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता जखमी वाढवेला वैद्यकीय तपासणी करून वापस पाठवले व साधी गुन्ह्याची नोंद सुध्दा घेतली गेली, नसल्याने आचार्य व्यक्त केल्या जात आहे. जर पोलीसच दारू वाल्यांना पाठीशी घालत असेल तर सामान्य जनतेने न्याय कोणाला मागायचा हे समजायला मार्ग नाही.
या दारू विक्रेत्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांनी सेवाग्राम पोलिसांना तक्रार केली पण मात्र अजून पर्यंत काय कारवाई झाली हे कळले नसल्याने हे दारू विक्रेते खुलेआम घुमत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून त्यानं अटक करावी व बाजार चौकातील दारू विक्री बंद करावी अशी मागणी पवनार वसियानी केली आहेय….