सिंदी रेल्वे येथील ड्रायपोर्ट पासून शेतकऱ्यांना शेतात जाणारा रस्ता केला बंद.
🔥 शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्या
🔥शेतकऱ्यांना १५ किलोमीटरचा फेरा मारून जावे लागते शेतात
🔥सिंदी रेल्वे येथील ड्रायपोर्टच्या पूर्व दिशेने परसोडी मार्गाकडून शेतकऱ्यांना पक्का रस्ता बांधून द्या
🔥राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी वर्धा यांना दिले निवेदन
सिंदी (रेल्वे) : सिंदी रेल्वे ड्रायपोर्टच्या पासून शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी मार्ग होता तो मार्ग बंद करण्यात आल्यामुळे पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याकरिता उपविभागीय अधिकारी वर्धा यांना राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी दिले निवेदन.सिंदी रेल्वे ड्रायपोर्ट पासून शेतकऱ्यांच्या जाण्या-येण्याच्या मार्ग होता तो बंद करण्यात आल्यामुळे,शेतकऱ्यांना १५ किलोमीटरचा फेरा मारून शेतात जावे लागत आहे.त्यामुळे अनेक शेतकरी शेत्या करून शकत नाही आहे.शेतकऱ्यांची वडिलोपार्जित शेत जमीन मौजा परसोडी, शिवादात असून त्या जमिनीलगत ड्रायपोर्ट कंपनीने शेती विकत घेतली आहे. त्या जमिनीवर कंपनीचे काम सुरु झाले आहे. ज्या जागेवरून शेतकऱ्यांच्या शेतीच्या वहिवाटीचा रस्ता होता तो रस्ता सिंदी रेल्वे ते कान्होलीबारा या नावाने पांदन रस्ता होता. तो रस्ता खोदकाम करून कंपनीने बंद केला आहे. परिणामी शेतकऱ्यांची पुढील शेती वहिवाट संपुष्टात येणार आहे आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबावर रस्ता बंद केल्याने उपासमारीची पाळी येऊ शकते. तहसीलदार साहेब सेलू यांनी शेतकऱ्यांना जो पर्यंत पर्यायी रस्ता होत नाही तो पर्यंत हाच रस्ता सुरु राहील असे आश्वासन दिले होते. परंतु आता पोलीस स्टेशनद्वारे शेतकऱ्यांना कळविण्यात आले कि हा रस्ता बंद करण्यात येत आहे. त्या बाबतचे शेतकर्याचे पोलीस स्टेशन ला बयान घेण्यात आले. शेतकऱ्यांनी आपल्या समस्या त्यांना बयानात सांगितल्या आहे.जो पर्यंत पर्यायी रस्त्याची व्यावस्था होत नाही तो पर्यंत तोच रस्ता पूर्ववत सुरु ठेवण्यात यावा पर्यायी व्यवस्था म्हणून ड्रायपोर्टच्या पूर्व दिशेने परसोडी मार्गाकडून वहिवाटीचा पक्का मार्ग देण्यात यावा.शेतकऱ्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरून सरकार च्या विरोधात आंदोलन करेल असा ईशारा राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांनी दिला आहे.यावेळी काँग्रेसचे सिंदी रेल्वे शहराध्यक्ष प्रकाशजी डफ, युगल अवचट, रामकृष्णाजी राडे, प्रशांतजी शेंडे, देवेंद्र झिलपे, नंदकीशोर अवचट, अजय तलमले, हर्षक बडवाईक, प्रशांत बडवाईक, जयंता बडवाईक, अजय गिरडे, डोमाजी बारई, चंपत बारई, रामचंद्र बारई, प्रवीण क्षिरसिकर, चंद्रभान हांडे, भाऊराव बोरकर, सुरेशराव ईखार, पन्नाजी मुडे, दत्तू मुडे,मोहन झिलपे, गोलू हांडे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते
सिंदी रेल्वे ड्रायपोर्ट पासून शेतकऱ्यांच्या जाण्या-येण्याच्या मार्ग होता तो बंद करण्यात आल्यामुळे, शेतकऱ्यांना १५ किलोमीटरचा फेरा मारून शेतात जावे लागत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी शेत्या करून शकत नाही आहे. शेतकऱ्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शेतकरी बांधव रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात आंदोलन करेल असा ईशारा दिला आहे.अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
दिनेश घोडमारे साहसिक न्यूज/24 सिंदी रेल्वे