🔥सेलूच्या जोशीनगरात ५२ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या
🔥घरगुती वादातून टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती; परिसरात हळहळ
सेलू -/ शहरातील जोशीनगर परिसरात एका ५२ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मुस्ताक शेख (वय५२) रा. जोशीनगर, सेलू असे मृत व्यक्तीचे नाव आहे. घरगुती वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे तसेच सेलू पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या उपस्थितीत आवश्यक कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, सेलू येथे नेण्यात आला.
या घटनेमुळे जोशीनगर परिसरात शोककळा पसरली असून, अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येमागील नेमके कारण आणि घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.