हिट अँड रन कायदा रद्द करण्यासाठी तहसीलदाराला दिले निवेदन.
देवळी : केंद्र शासनाच्या वतीने वाहतुकीसाठी नवीन कायदा हीट अंड रन बनविण्यात आलेला आहे. अपघाताचे प्रमाणात होत असलेल्या वाडी मुळे चिंतीत झालेल्या सरकारने हा नवा कायदा अंमलबजावणी त आणला आहे. परंतु वाहन चालक मालक संघटनांनी हा कायदा वाहन चालकांसाठी अन्यायकारक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे वाहतूक करणारे वाहन चालक व मालक संघटना सध्या संपावर गेलेल्या आहे देवळीतही वाहन चालक-मालक संघटनांनी संप पुकारलेला आहे आणि सोमवारी दुपारी शिवसेना प्रणित वाहतूक सेना व जय संघर्ष वाहन चालक मालक संघटना च्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज देवळी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे हा कायदा शासनाने त्वरित रद्द करावा नाहीतर या कायद्याचा फेरविचार करावा अशी विनंती या निवेदनातून तहसीलदाराच्या माध्यमातून केंद्र सरकारला केली आहे यावेळी तहसीलदार दत्ता जाधव यांनी निवेदन स्वीकारून आपण या निवेदना ची परत शासनाला पाठवून तुमची भावना आम्ही शासनाला कडू असे आश्वासन यावेळी तहसीलदार दत्ता जाधव यांनी दिले तसेच या संघटनांनी देवळी चे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांना सुद्धा निवेदन देऊन आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवा अशी विनंती केली यावेळी वाहतूक सेनेचे शहर प्रमुख सुहास कुन्हटकर तसेच जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनाचे कार्यकर्ते तसेच अजिंक्य तांबेकर,, निलेश तिडके,अरुण आत्राम, सौरभ क्षिरसागर . अंकुश अराडे,, संदीप राऊत, रवी डडमल ,, सुनील तेल रांधे गोलू महाजन गणेश इरपाते, प्रमोद रघाटाटे प्रमोद वानखेडे, सचिन चौधरी, आकाश जामनकर तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सागर झोरे साहसिक न्यूज-/24 देवळी