७५वा गणराज्य दिन ग्रामीण गाव खेड्यातही चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा..
वर्धा : सेलू तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागातील २६ जानेवारी चा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला असल्याची दिसून आले. मदनी येथील प्राथमिक शाळा येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त चिमुकल्यांचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.भारतीय प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण भागातही उत्साहात कर्तव्य पथावर सुरू असल्याचे दिसून आले. आज पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत ही तयारी सुरू झाली होती. चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व विविधतेचे दर्शन घडते. दरवर्षी २६ जानेवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी आपण ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार असून हा दिवस देशासाठी महत्वाचा आहे. भारताने २६ जानेवारी १९५० मध्ये नव्याने तयार केलेली राज्यघटना लागू केली आणि भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला. याच दिवसांपासून २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो. मात्र,या दिवसाचे महत्व खूब विशेष आहे.चिमुकल्यांची भाषणे नृत्य या विविधतेमुळे त्यांच्यात असणारा आत्मविश्वास झळकत होता यात शिक्षक वृंदांकडून विद्यार्थ्यांना मिळणारे सहकार्य यामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल नक्कीच वाढवण्यात महत्त्वाचे ठरते.
गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज/24 वर्धा