झडशी शिवारात वाघाने केली कालवडीची शिकार
Byसाहसिक न्युज 24
गजेंद्र डोंगरे/ मदनी (आमगाव)
परिसरातील झडशी शिवारात पट्टेदार वाघाने शिरकाव केला असून एका कालवडीची शिकार केल्याने शेतक – यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा. अशी मागणी होत आहे. मान्सून पावसाच्या प्रतिश्रेत असलेले शेतकरी पेरणीपूर्व मशागत करून सज्ज झाले आहेत. तर काही शेतक यांची मशागतीसाठी लगबग सुरू आहेत. वनरक्षक रजणा बाहादुरे,विठ्ठल उडान, यांनी पंचनामा केला आहे.
अशातच पावसाचे दिलेल्या वेळेत आगमन झाल्यास पेरणीची लगीनीनघाई सुरु होणार आहे. अशा सर्व गडबडीत शेतकरी असताना काल रात्री पट्टेदार वाघाने शिरकाव केला. शेतकरी निरंजन आनंदराव सहारे यांचा मालकीच्या कालवडीची शिकार केली. निरंजन सहारे यांच्या मालकीची झडशी ते येळकळी मार्गावर शेत असून पट्टेदार वाघाने कालवडीची शिकार केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळण्यात यावी अशी मागणी होत आहे.