परमेश्वर शिवाला सर्वस्व अर्पण करणे हीच खरी महाशिवरात्री – माधुरी दिदि

0

🔥परमेश्वर शिवाला सर्वस्व अर्पण करणे हीच खरी महाशिवरात्री – माधुरी दिदि.

सेलू -/ परमेश्वर एक आहे याचे वर्णन आपण सगळेजण करतो, त्यांचे वास्तविक स्वरूप ज्योतिर्बिंदू आहे म्हणून शिवलिंग हे अंगठ्या च्या आकाराचे बनवितात व त्याला शिव ज्योतिर्लिंग असे म्हणतात. ते कलियुग रुपी रात्रीच्या अज्ञान अंधकार नष्ट करतात व सगळ्यांना ज्ञानाचा प्रकाश देन्या करीता परकाया प्रवेश करतात , म्हणून या परवाला महाशिवरात्री असे म्हणतात. शिवजी हे सर्व देवी देवतांचे आराध्य आहेत श्री राम जी ने रामेश्वरम मध्ये शिवजी ची आराधना केली तसेच श्रीकृष्ण जी ने देखील गोपेश्वरं मध्ये शिवजीं ची आराधना केली. सर्वधर्मपितांनी देखील निराकारालाच मानलेले आहे फक्त सगळ्यांची भाषा ही वेगवेगळी आहे म्हणूनच शिवाजींना देवांचे ही देव महादेव असे म्हटले जाते. त्याच अनुषंगाने हा महाशिवरात्री पर्व या ब्रह्माकुमारीज् संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो व जवळपास एक महिना चालतो. परमेश्वराला सर्वस्व अर्पण केल्यानेच आपले जीवन सफल आहे तेच आपले तारणहार आहेत अशा प्रेरणादायी वक्तव्याने वर्धा सेवा केंद्र संचालिका माधुरी दीदी यांनी महाशिवरात्रीचे अध्यात्मिक रहस्य उद्घाटन केले. वरिष्ठ समाजसेवक रामेश्वरजी धर्मुळ महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत म्हणाले या संस्थेमध्ये सर्व सण खूप सुंदर पद्धतीने साजरे केल्या जातात . त्या सणांचे अध्यात्मिक रहस्य सांगितले जाते व संघटित रूपाने ते साजरे केले जाते ही इथली विशेषता आहे. वर्धा सेवा केंद्र येथील मधु दीदी शिवध्वजारोहनाचे महत्व विशद करीत म्हणाल्या- ज्याप्रमाणे तडीत थंड घराला विजांपासून सुरक्षित ठेवते तसाच हा शिवध्वज ज्या वास्तूवर लावल्या जाते ते स्थान सर्व समस्यांपासून मुक्त राहते. माहेर शांती निवास सेलू येथील अतुल भाऊ शेळके म्हणाले की आपले आराध्य एकच असावेत व माणुसकी हाच खरा धर्म त्याचे आपण पालन करावे. ब्रह्माकुमारीज् सेलू चा मी खूप आभारी आहे की त्यांनी मला व आमच्या आश्रमातील लोकांना येथे बोलवले .
ब्रह्माकुमारीज् सेलू सेवा केंद्राद्वारे महाशिवरात्रीचा कार्यक्रम दिनांक 12 फरवरीला संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात शिवध्वजारोहनाने झाली. त्यानंतर पाहुण्यांनी नयन रम्य झाॅंकीचे उद्घाटन केले.या झाॅंकी मध्ये एकाच वेळी अमरनाथ जी ( बाबा बर्फानी ),शंकर – पार्वती जी, राजा विक्रमादित्य व सोमनाथ जी यांचे दर्शन भाविकांना घडले . या शोभनिक झाॅंकी मध्ये शंकर जी ची भूमिका शितल लिडबे , पार्वती जी ची भूमिका भाविका मानकर, राजा विक्रमादित्य ची भूमिका चेतक धोंगडे यांनी साकारली .कु.पूर्वी धोंगडे, कु. स्वरज्ञा करंदे, कु. युक्ती कुकडे यांनी सुंदर नृत्य प्रस्तुत केल. भारती मानकर व विजय वाघमारे यांनी भजन सादर केले.

          चैताली गोमासे                    साहसिक News-/24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!