🔥जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने स्त्री आरोग्य मार्गदर्शन.
देवळी -/ येथील खैरे कुणबी रणरागिणी मंच शाखेच्या वतीने जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला.
कार्यकार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रणरागिणी मंचाच्या महाराष्ट्र अध्यक्षा संगीताताई बढे होत्या,तर प्रमुख अतिथी म्हणून जयश्री ताई वाकडे,वंदना ताई डोंगरे होत्या.प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.अनुराधा खांडेकर आयुर्वेदिक फिजिशियन महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सेवाग्राम , डॉ.प्रीती वंजारी अध्यक्षा निमा वुमेन्स फोरम वर्धा या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून,माँ दुर्गाच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांचे स्वागत शुभांगी सुकळकर यांनी स्वागत गीताने केले.
वीस वर्षापूर्वी पतीला किडनी देऊन संसाराचे रक्षण करणाऱ्या,खऱ्या आयुष्यात रणरागिणी ठरलेल्या जयश्री ताई वाकडे यांचा या निमित्ताने स्त्रीशक्ती म्हणून शाल,आणि गौरवग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला.
अध्यक्ष पदाचे मार्गदर्शन करताना संगीताताई बढे म्हणाल्या,आजची स्त्री ही जगायला शिकली आहे,तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली आहे.तिला प्रेमाने समजून घेतले तर ती समजायला खूप सोपी आहे.तिला समजण्यात चूक करू नये कारण तिच्यामध्ये इतिहास लपला आहे.
यावेळी स्त्री आरोग्यावर डॉ.प्रीती वंजारी यांनी आजची बदललेली जीवनशैली आणि त्यांवर उपाय यावर मोलाचे मार्गदर्शन केले.
डॉ.अनुराधा खांडेकर यांनी स्त्रियांच्या जीवनातील वाढता मानसिक तणाव व त्याचा शरीरावर होणारा दुष्परिणाम आणि तणाव मुक्त जीवन जगण्याचे सूत्र यांवर महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
यावेळी सोनम चकोले,रूपाली महाजन दीपाली महाजन यांनी स्त्रीच्या कर्तृत्वावर आधारित नृत्य सादर केले.
काहींनी कविता सादर केल्या.कार्यक्रमाचे संचालन पौर्णिमा सुखळकर यांनी केले तर
वर्षा तेलरांधे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
चहा नाश्त्याने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रमाला उपस्थित रणरागिणी संगीता बढे,जयश्री वाकडे,वंदना डोंगरे, ज्योत्स्ना शेलोटे,दीपाली महाजन,रूपाली महाजन,सुषमा तेलरांधे,सोनम चकोले,छबुताई लांडे,शुभांगी सुकळकर,
पौर्णिमा सुखळकर,माधुरी कुबडे ,प्रिया नांदुरकर,मनिषा चकोले,नीता राऊत, वर्षा तेलरांधे,उगेमुगे,कडू, माया देशमुख,भोकरे, सायंकार,अर्चना नासरे, हर्षा लांडे,सारिका काटेखाये,
आदींनी सहकार्य केले.