🔥पुरवठा निरीक्षकाची लेट लतीफी , नागरिकांना सहन करावा लागतो त्रास
देवळी -/ देवळी तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागात सध्या तुकलकी कारभार सुरू असल्याचे नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे.देवळी येथील पुरवठा निरीक्षक अधिकारी कार्यरत असून सदर कार्यालयात पुरवठा निरीक्षकाची कार्यालयात वेळेवर न येण्याची सवय झाली असून ते नेहमी उशिरा येत असल्यामुळ , नागरिकांना धान्य कार्ड, प्रमाणपत्र, नाव समाविष्ट करणे नाव कमी करणे यांच्यासह इतर अनेक कामे अनेक महत्त्वपूर्ण कामांकरिता नागरिकांना तासंतास वाट पाहत बसत असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. पुरवठा च्या लेट लतिफी नागरिक त्रस्त झालेले आहे.
कालच वर्तमान पत्रांमध्ये या बाबत बातम्या प्रकाशित झाल्या पण या गोष्टीचा पुरवठा निरीक्षक अधिकारी यांच्या वर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसून आले कालही त्या उशिरा कार्यालयात आल्या व संध्याकाळी 5 वाजताच कार्यालयातून निघून गेल्याचे समजते या गोष्टीची वरीष्ट अधीकार्यांना पुष्टी करायची असल्यास बस स्टॉप वर असलेले सि सि टी व्ही फुटेज पाहू शकतात.
अश्याच प्रकारे अधिकारी उशिरा येऊन लवकर घरी जात असेल तर नागरिकांची कामे वेळेत कशी होणार हाही प्रश्नच आहे. पुरवठा अधिकारी मुख्यालय राहात नसून ते देवळीवरून 60 किमी अंतरावर आपल्या कुटुंबासोबत राहतात. ते कार्यालयामध्ये दुपारी 12 नंतर येतात तर सायंकाळी कार्यालयाची वेळ संपण्याअगोदरच जातात ते कार्यालयातून आपल्या गावी निघून जातात.
🔥पुरवठा कार्यालयात दलालांचा सुळसुळाट
पुरवठा निरीक्षक कार्यालयीन वेळ संपण्याअगोदर निघून जाण्यापूर्वी दलालांच्या स्वाधीन कार्यालय सोडून जातात. त्यामुळे त्यामुळे हे दलाल तेथे येणाऱ्या गरीब शेतकरी व मजुरांची आर्थिक पीडवणूक करून त्यांचे कामे करतात. अशी तेथे जाणाऱ्या नागरिकांमध्ये चर्चा आहे.
🔥नागरिकांमध्ये असंतोष निलंबनाची मागणी
नागरिकांना होत असलेल्या त्रासा, दलालांचा सुळसुळाट, शेतमजुरांची आर्थिक पळवणूक, अधिकाऱ्यांची वेळेला दांडी, या सर्व त्रासामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. संबंधित अधिकाऱ्यावर विलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे.
🔥तहसीलदाराची मुख्यालयीन रहण्याला दांडी.
देवळी तहसील कार्यालयाजवळ तहसीलदार व नायब तहसीलदार यांना राहण्याकरिता सुसज्ज असे निवासस्थान असताना सदर अधिकारी येथे न राहता बाहेरगावी राहतात त्यामुळे कार्यालयामध्ये वेळेवर येण्यास विलंब होतो. उद्या शासनाने दुष्काळी परिस्थिती घोषित केली आहे शेतकऱ्याचे हाल होत आहे ते कार्यालयामध्ये आपल्या कामाकरिता चकरा मारत असतात परंतु तहसीलदार व इतर अधिकारी आपल्या कार्यालयीन वेळेच्या आत कधीच कार्यालयात येत नसल्यामुळे येणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. जो तहसीलचा मुख्य आहे तो तहसीलदार वेळेवर येत नसल्यामुळे कर्मचारी सुद्धा कार्यालयीन वेळेवर येत नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तहसीलदार यांना निवासस्थानी राहण्याची सक्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.(क्रमशः)