पत्रकारास धक्काबुक्की करणाऱ्या एपीआय पंकज दाभाडे यांच्यावर कार्यवाही करा.

0

🔥पत्रकारास धक्काबुक्की करणाऱ्या एपीआय पंकज दाभाडे यांच्यावर कार्यवाही करा.

🔥आर्णी तालुका पत्रकार च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन.

 आर्णी -/ दारवा तालुक्यातील भांडेगाव येथील टोल नाक्यावर आंदोलनाचे वृत्तसंकलन करीत असताना,त्या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक(एपीआय) पंकज दाभाडे यांनी ‘दैनिक लोकसूत्र चे’ संपादक केशव सवळकर यांच्याशी गैरवर्तन करीत धक्काबुक्की केली.या घटनेच्या निषेधार्थ आर्णी तालुका पत्रकार च्या वतीने च्या वतीने तहसीलदार आर्मी यांना निवेदन देऊन, एपीआय पंकज दाभाडे यांचेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात स्पष्ट केले की, तालुक्यातील भांडेगाव येथे महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे टोल नाका बंद करण्यासंदर्भात आंदोलन सुरू असताना,त्या ठिकाणी वृत्तसंकलनासाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांना,
ओळखपत्र पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी पुढे जाण्याची परवानगी दिली होती. मात्र, कर्तव्यावर असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे यांनी
पत्रकारांसी धक्काबुक्की व गैरवर्तन केले . दै. लोकसूत्र चे संपादक केशव सवळकर यांनी आपले ओळखपत्र दाखवूनही दाभाडे यांनी त्यांच्याशी उद्धट भाषेत बोलून धक्काबुक्की केली.तसेच पत्रकारांशी ओळखपत्र दाखवून ही गैरवर्तन केले.या पोलीस अधिकाऱ्याच्या अशा वागणुकीमुळे पत्रकारांमध्ये तीव्र रोष असून,संतापाची लाट उसळली आहे.त्यामुळे पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्या पंकज दाभाडे यांच्यावर कठोर कार्यवाही करावी.अशी मागणी आर्मी पत्रकार च्या वतीने जाफर शेख रंजना आडे शहाणू चव्हाण इरफान बेग सुनील राठोड वीरेंद्र पाईकराव निवेदनाद्वारे केली आहे.

       ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 आर्णी,यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!