मारेगावात बोगस पत्रकारांची चौकशी सुरु,पोर्टलछाप विरोधात नगरसेवक गेडाम यांचा एल्गार

0

🔥मारेगावात बोगस पत्रकारांची चौकशी सुरु,पोर्टलछाप विरोधात नगरसेवक गेडाम यांचा एल्गार.

यवमाळ -/ मारेगाव तालुक्यात बोगस पत्रकारांना उधान आले आहे. अशा सर्वच पोर्टलछाप पत्रकाराची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.तालुक्यातील अनेक पोर्टलछाप बोगस पत्रकारांची फौज उभी असल्यामुळे पोर्टलची शासन दप्तरात नोंदणी केली आहे का?. जाहिरात वसुलीसाठी जिएसटी प्रमाणपत्र आहे का?याबाबत चौकशीचे मुद्दे असुन दरम्यान अधिकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधी कडुन वसुली केलेल्या पैशाची जी.एसटी व ईंकम टॅक्स रिटर्न भरला आहे का?याबाबतचा एडिट रिपोर्ट सह पावत्या सादर कराव्या या चौकशीत कोणत्याही पोर्टलछाप पत्रकाराने पुरावे सादर न केल्यास खंडणीसह बोगस पत्रकार म्हणुन गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षा पासुन काही पोर्टलछाप बोगस पत्रकारां कडुन पैशे न दिल्यास खोट्या बातम्या छापुन ब्लॉकमेल करीत आहे. या बोगस प्रकाराला तालुक्यातील स्वयंघोषित पुढारी खतपाणी देत आहे. हा स्वयंघोषित पुढारी ब्लाॅकमेलसाठी उपोषणाच्या हत्याराचा वापर करीत असुन पेंडालसह ईतर खर्च करीत आहे. या स्वयंघोषित पुढाऱ्यामुळे तालुक्यातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. मारेगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका आहे.तालुक्यात सर्वच जाती धर्माची लोक गुण्या गोविंदाने नांदत आहे.मात्र या स्वयंघोषित पुढाऱ्याने तालुक्यातील सलोख्याचे वातावरण बिघडवले आहे.पोर्टलछाप बोगस पत्रकारांना हाताशी धरुन अनेक कारनामे तालुक्यात सुरु आहे. महिलांना सुध्दा खोटे रिपोर्ट देण्यासाठी प्रवृत्त करतो, या प्रकारामुळे तालुक्यात खुनखराबा होण्याची शक्यता आहे. खुन खराबा होण्यापुर्वी या बोगस पत्रकाराची चौकशी करण्यात यावी या बोगस पत्रकारांनी या स्वयंघोषीत पुढाऱ्याच्या भरवशावर हौदोस माजवला आहे. हा दलबदलु स्वयंघोषित पुढारी अनेक सामान्य नागरिक अडचणीत सापडले आहे. मात्र मांडवली करुन त्यांना सोडुन दिले जात आहे. तालुक्यात खोट्या तक्रारीच्या पाठीमागे याचा हात असुन खंडणी वसुलीसाठी हा अनेक फंडे वापरत आहे. याच्या अवती भोवती बोगस पत्रकाराची फौज असुन व्यापारी, अधिकारी, कर्मचारी, रेती परवाना धारका कडुन यांनी पैशाची वसुली केलेली आहे.मात्र या पैशातुन जि.एस.टी.ईंकम टॅक्स भरला किवा कसे याबाबत ही चौकशी सुरु आहे. स्वयंघोषित पुढाऱ्याच्या भरवशावर जे पोटभरु बोगस पत्रकार आहे त्यांचे विरोधात कायदेशिर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मारेगावचे नगरसेवक अनिल गेडाम यांनी केली होती.यासाठी त्यांनी उपोषण20 मे पासुन आमरण उपोषण करण्याचा ईशारा दिला होता.या मागणीची दखल घेत पोलीस प्रशासनाने तालुक्यातील सर्व पोर्टल छाप बोगस पत्रकारांची चौकशी सुरु केली असुन अनेकांना नोटिस बजावण्यात आल्या आहे त्यामुळे बोगसपत्रतकाराचे धाबे दणानले असुन खळबळ उडाली आहे. 20 मे दुपारी 1 वाजे पासुन पोलीस स्टेशन समोर नगरसेवक अनिल गेडाम हे उपोषण सुरु करणार होते..हे उपोषण तालुक्यातील शांतता टिकुन राहण्यासाठी असुन बोगस पत्रकारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी या आंदोलनातुन मागणी करण्यात आली होती. मात्र मागणीची दखल घेऊन त्यांना कारवाईचे आश्वासन देण्यात आले होते या आश्वासना नुसार अनेक बोगस पत्रकारांना नोटिस बजावण्यात आली आहे.तर अनेकांना लवकरच नोटिस पोहचणार असुन कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

बोगस पत्रकाराच्या पोर्टलची 1)अधिकृत नोंदनी व जिएसटी प्रमाणपत्र नसतांना जाहिरातीच्या नावाखाली खंडणी मागणे.

2)मारेगाव च्या स्वयंघोषीत पुढाऱ्याच्या भरवशावर वाटेल त्याची बदनामीकारक वृत्त छापणे,

3)ब्लॉकमेल साठी उपोषण करुन वातावरण पेटवणे.

4) कोणत्याही बातम्याची शहनिशा न करता एकतर्फी फोकनाड्या बातम्या पोर्टलवर अपलोड करणे

5)लोकांना धमकावणे,पैशे दिल्यास गप्प बसणे*

6)स्वयंघोषित पुढाऱ्यांचा अशा बोगस पत्रकारांना आशिर्वाद.

7)सकाळी पासुन संध्याकाळ पर्यत खोट्या कारनाम्यां साठी.

ज्ञविशेष बक्षीस देणे.

—————————————————————

पोर्टलछाप बोगस पत्रकार विरोधात माझा एल्गार सुरु आहे. पोर्टलछाप बोगस पत्रकाराकडे वसुल केलेल्या आर्थिक व्यवहाराचा लेखाजोखा नाही. पोर्टलची अधिकृत नोंद नाही.अशा बोगस पत्रकारांवर पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांनी तात्काळ गुन्हे दाखल करुन अटक करावी अन्यथा मी पोलीस स्टेशन समोर उपोषण सुरु करणार

अनिल गेडाम

नगरसेवक मारेगाव

——————————————पोर्टल धारक संपादक,पत्रकार यांनी विनंती अर्ज केला आहे. चौकशी करुन कारवाई करा त्यानुसार त्यांना तीन दिवसाची संधी देण्यात आली आहे. चौकशीतील मुद्यावर पुरावे सादर करावे मुदतीत पुरावे सादर न केल्यास गुन्हे दाखल करण्यात येईल

श्याम वानखेडे

पोलीस निरीक्षक मारेगाव.

       श्रीधर सिदाम साहसिक    News-/24 मारेगाव,यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!