पोटखराब जमिनीवरून हजारो ब्रास मुरूम चोरी; शासनाला लाखोंचा फटका.

0

🔥हेच ते पोटखराब जमिनीवरून हजारो ब्रास मुरूम चोरी; शासनाला लाखोंचा फटका.🔥हेच ते महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे गौण खनिज माफियांचे फोफावले जाळे.

(आष्टी शहीद :-ता.प्रतिनिधी-नरेश भार्गव)

तळेगाव -/ (श्या. पं.) व साहू र परिसरातील पोटखराब जमिनीवरून मोठ्या प्रमाणात गौण खनिज अर्थात मुरूमाची अवैध उत्खनन करून चोरी करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तळेगाव, रामदरा आणि काकडदरा, डोगरगाव,साहूर, द्रुगवाडा,मौजांमधील विविध भागातून गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत हजारो ब्रास मुरूम चोरी गेल्याचे दिसून येत असून, यामुळे शासनाच्या महसुलाला लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

विशेष म्हणजे या चोरी गेलेल्या गौण खनिजावर आकारण्यात येणारी स्वामित्व धन (रॉयल्टी) शासनाच्या तिजोरीत जमा न होता थेट मुरूम माफियांच्या घशात गेल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारसह इतर सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने मुरूम उपसा करण्यात येतो. रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या या अवैध उत्खननाकडे महसूल विभागाने मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. त्याचप्रमाणे देवगाव येथील मध्ये 40 फुटाचे गड्डे करून ठेवून त्यामध्ये जंगली जनावरे पडून मरतात व रात्री बेरात्री शासकीय जंगलाचा भाग मधून सुद्धा उत्खलन होण्याची माहिती मिळालेली आहे त्या सर्व बाबीची तहसील विभागाला पूर्णता माहिती असून त्यांना या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करण्याकरिता आर्थिक मदत देण्यात येत असल्याची चर्चा आहे

तळेगाव येथे महसूल विभागाचे मंडळ अधिकारी कार्यालय तसेच तलाठी कार्यालय कार्यरत असून गावात तीन तलाठी आणि एक मंडळाधिकारी नियुक्त आहेत. मात्र एवढी मोठी मुरूम चोरी सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई न केल्याने संशय व्यक्त केला जात आहे. “महसूल विभागाच्या आशीर्वादाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात मुरूम चोरी शक्यच नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

पोटखराब जमिनींमध्ये मोठमोठे खड्डे पडले असून पर्यावरणाचा समतोलही धोक्यात आला आहे. भविष्यात पावसाळ्यात हे खड्डे अपघातांना कारणीभूत ठरू शकतात, अशी भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांनी तळेगाव, रामदरा , द्रुगवाडा डोंगरगाव ,साहूरआणि काकडदरा परिसराची तात्काळ पाहणी करून पोटखराब जमिनीवरील खड्ड्यांचे मोजमाप करावे, चोरी गेलेल्या मुरूमाचा पंचनामा करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता परिसरातून होत आहे.(क्रमशः)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!