श्री सूर्य हनुमान मंदिर येथील हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात राज्यमंत्री पंकजजी भोयर यांच्या हस्ते सत्कार व नगराध्यक्ष सुधीरभाऊ पांगुळ यांच्या उपस्थितीत जन्मोत्सव सोहळा साजरा.
🔥श्री सूर्य हनुमान मंदिर येथील हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात राज्यमंत्री पंकजजी भोयर यांच्या हस्ते सत्कार व नगराध्यक्ष सुधीरभाऊ पांगुळ यांच्या उपस्थितीत जन्मोत्सव सोहळा साजरा.
वर्धा -/ दि २ एप्रिल २६ रोजी श्री सूर्य हनुमान मंदिर येथील दोन दिवसीय श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला त्यात पहिल्या दिवशी भक्तिमय भजन संध्येचे आयोजन करण्यात आले दुसऱ्या दिवशी हनुमान जन्मोत्सव व भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आला .त्याप्रसंगी राज्यमंत्री डॉ.पंकजी भोयर यांच्या हस्ते श्री गुरूदेव भजन मंडळ जे निःशुल्क भजन संध्या व तुकडोजी महाराजांचे कार्याचे भजनांच्या माध्यमातूनकरीत असलेल्या प्रचाराप्रसार निमित्त श्री सूर्य हनुमान मंदिर येथे सत्कार करण्यात आला.तसेच त्या प्रसंगी उपस्थित असलेले मंडळाचे कार्यकर्ते महेश बोरेकर,बंटी खडसे, प्रवीण बुराडे, विक्रांत चौधरी,निलेश बोरेकर, अजय कापसे,सुनील कामडी,अमोल पेटकर, संजय फुलंबरकर,मामा वालदे,योगेश बोरेकर, संजय जिनेवार, रणजीत देशमुख, बालू साठवनकर, हरिष खडसे हे करीत असलेल्या धार्मिक कार्य बद्दल त्यांचे राज्यमंत्री पंकजजी भोयर व नगराध्यक्ष सुधीरभाऊ पांगुळ यांनी केला गुणगौरव.