🔥मोई (तांडा )गावात वन तलावाच्या विहिरीतून येणारे पिण्याचे पाणी दूषित.
🔥दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
🔥नवीन विहीर खोदण्यासाठी निधी मंजूर करा गावकर्यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली मागणी.
आष्टी शहीद -/ आष्टी तालुक्यातील घनदाट जंगलात वसलेल्या मोई (तांडा )गावात वन तलावात असलेल्या विहिरीतून पाईप लाईन द्वारे मोई तांडा गावात पिण्याचे पाणी दूषित येत असल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पर्याय म्हणून नवीन विहीर मंजूर करून पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी गट विकास अधिकारी रामटेके यांना निवेदन देऊन नागरिकांनी केली आहे.
सविस्तर असे कि,
आष्टी तालुक्यातील घनदाट जंगलात वसलेल्या मोई तांडा गावात पिण्याच्या पाण्याची समस्या पाच पाववीलाच पूजली आहे. गावकर्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बहिष्कार टाकल्यावर या गावाला शासनाने पाणी पुरवठा योजना मंजूर करून दिली. पाणी पुरवठा करणारी विहीर ही वन तलावाच्या जागेत असल्यामुळे या विहिरीत मृत जनावरचे सापळे व घाण पाणी विहिरीत जात असल्याची ग्रामस्याची तक्रार आहे. पाणी शुद्ध करणारे यंत्रणा काम करीत नसल्याने घाण पाणी पिण्यात येत आहे. पाणी पिण्यात येत असल्यामुळे विविध आजार गावात बलावले आहे. माजी उपसरपंच किसन महाराज चव्हाण, सरपंच सुषमा चव्हाण यांचे पती गजानन चव्हाण,बालकिसन राठोड, अंकुश चव्हाण, मनोज चव्हाण यांनी गट विकास अधिकारी रामटेके यांना निवेदन दिले व तात्काळ उपाय योजना करा अशी विनंती केली. गट विकास अधिकारी यांनी मोई गावात येऊन समस्या मार्गी लावतो असे आश्वासन दिले.