🔥सुजन संघटन अभियान अंतर्गत काँग्रेसची बैठक संपन्न.
आर्णी -/ माननीय श्री शिवाजीराव मोघे साहेब महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री असताना त्यांनी तालुक्यासाठी मोठे विकासात्मक कामे खेचून आणली ज्यामध्ये पाणीपुरवठा योजना असो की जवळा येथील 33 केवीचे प्रकल्प असो त्यांनी नेहमीच जनसेवेला प्राथमिकता दिली असून परंतु काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांच्या हेकेखोरपणामुळे गेल्या तीन विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला पराभव पत्करावा लागले असले तरीही समोर जिल्हा परिषदा व पंचायत समिती च्या निवडणुकीचे अनुषंगाने
काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आज आर्णी येथील धूमाजी नाईक मंगल कार्यालय येथे ‘सृजन संघटन अभियान’ अंतर्गत महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थान ऑल इंडिया काँग्रेसचे निरीक्षक मा. श्री. संजयजी कपूर यांनी भूषविले. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना कपूरजींनी आगामी काळातील आव्हाने आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सखोल मार्गदर्शन केले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला व्यासपीठावर राज्याचे माजी मंत्री मा. अँड. शिवाजीराव मोघे साहेब, यवतमाळ जिल्हा निरीक्षक प्रभारी मा. श्री. भैय्यासाहेब पवार, मा. श्री. शकुरजी नागणी, जिल्हाध्यक्ष मा. श्री. प्रफुलजी मानकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मा. श्री. मनीषजी पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे मा. श्री. जितेंद्रभाऊ मोघे, आर्णीचे नगराध्यक्ष मा. श्री. नालंदाजी भरणे, शाहिद रायानी आणि सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. कृष्णा पुसनाके यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाध्यक्ष मा. प्रफुलजी मानकर यांच्या प्रास्ताविकाने झाली, ज्यामध्ये त्यांनी जिल्हयातील संघटनात्मक कार्याचा आढावा मांडला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन गटनेते मा. श्री. अमोल मांगुळकर यांनी केले, तर उपस्थित सर्वांचे आभार तालुकाध्यक्ष मा. श्री. नरेश राठोड यांनी मानले. या बैठकीमुळे आर्णी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्या तील आपसी रस्सीखेच थांबणार का हा विषय महत्त्वाचा ठरेल.