🔥साहुर येथील बँक ऑफ इंडिया मध्ये कर्मचारी योगेश मंगडे यांच्या कडून शेतकऱ्यांना उद्धटपणाची वागणूक
साहूर,शरद वरकड -/ आष्टी तालुक्यातील साहुर येथे बँक ऑफ इंडियाची शाखा असून या ठिकाणी प्रमाणापेक्षा ग्राहक जास्त असल्याने बँक ऑफ इंडिया येथील कर्मचारी योगेश मंगडे हा ग्राहकांना तसेच शेतकऱ्यांना उद्घटपनाची वागणूक दिल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे ज्या शेतकऱ्यांचे खाते एनपीए झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या खात्यातून पैसे काढता येत नसल्याने दुसऱ्याच्या नावे ट्रान्सफर करावे लागतात त्यानंतर दुसऱ्याच्या खात्यात जमा झाल्यानंतर ते काढून शेतकऱ्यांना मिळतात अशावेळी मोठी जोखीम स्वीकारून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यावर पैसे जमा करावे लागते . दुष्काळाची परिस्थिती असल्याने शेतकरी हवालदार झाला असून शासनामार्फत जी मदत मिळते तीही वेळेवर काढता येत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे अशातच जेव्हा शेतकरी बँकेत जाऊन विचारतो की साहेब ट्रान्सफर केलेले पैसे कधी मिळेल तेव्हा येथील कर्मचारी योगेश मंगडे हा उद्धटपणे बोलून त्या शेतकऱ्याला दीड महिन्याचा कालावधी सांगतात व दुसरीकडे खाते काढा असा सल्ला देतो त्यामुळे शेतकरी वैतागून गेलेले आहेत इतका वेळ कसा काय लागतो असा प्रश्न जर विचारला तर गल्ली पासून तर दिल्लीपर्यंत शहरांची नावे सांगत त्या ठिकाणी तपासणी होऊन नंतर दीड महिन्याच्या कालावधीनंतर तुमचे पैसे ट्रान्सफर होईल अशा प्रकारचे उद्धटपणाणे बोलून शेतकऱ्यांचा अपमान या बँक ऑफ इंडिया मध्ये होत असल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे या बँक ऑफ इंडियाचे ग्राहक व शेतकरी आक्रमक पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे हा उद्धट बोलणारा कर्मचारी योगेश याची लवकरात लवकर हकलपट्टी करण्याची मागणी येथील शेतकरी करीत आहे साहुर येथील शेतकरी नरेंद्र थोर यांचे खाते एनपीए झाले असून स्वतःचे पैसे स्वतः काढता येत नसल्याने दुसऱ्या अकाउंट वर ट्रान्सफर करण्याकरता स्लिप भरली आणि येथील कर्मचारी योगेश याला विचारणा केली असता तो दीड महिन्याचा कालावधी सांगून उद्धटपणे बोलला असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलेला आहेत त्यामुळे येथे मिळत असलेली वागणूक ही अत्यंत निंदनीय असून अशोभनीय आहे अशा उद्धट कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी येथील शेतकरी करीत आहे तसेच वरिष्ठांकडे तक्रार सुद्धा करणार असल्याचे येथील शेतकऱ्यांनी आपले मत व्यक्त केले आहे
🔥मी साहुर येथील शेतकरी असून माझे खाते बँक ऑफ इंडिया साहुर येथे आहेत आणि माझे खाते एनपीए झाले असून मला पैसे काढता येत नाही दुसऱ्याच्या अकाउंटवर टाकून पैसे काढावे लागतात मी या कर्मचाऱ्याला किती कालावधी लागतो असे विचारले असता हा कर्मचारी उद्धटपणे बोलून दीड महिन्याचा कालावधी मला सांगितला व दुसरीकडे खाते काढण्याचा सल्ला दिला त्यामुळे मला मोठा धक्का बसला म्हणून अशा कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहेत(नरेंद्र थोर शेतकरी)