देवळी तहसील अधिकाऱ्याच्या गाडीचा अपघात,अपघातात देवळी तहसील ची महिला अधिकारी किरकोळ जखमी.

0

🔥हीच ती देवळी तहसील अधिकाऱ्याच्या गाडीणे रेल्वे फाटकच्या खंब्याला धडक देऊन झाला अपघात.

🔥अपघातात देवळी तहसील च्या महिला अधिकारी किरकोळ जखमी.

देवळी -/ शुक्रवार आठ मार्च रोजी देवळी रेल्वे क्रॉसिंग कार अनियंत्रित झाल्यामुळे रेल्वे फाटकाच्या खंब्याला जाऊन भिडली त्यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले.
प्राप्त माहितीनुसार देवळी तहसील कार्यालयातील एक महिला अधिकारी वर्धा कडून देवळीला येत असतांना रेल्वे क्रॉसिंग च्या समोरील गतिरोधक वरून गाडी अनियंत्रित होऊन रेल्वे फाटकच्या खंब्याला धडक दिली व रेल्वे फाटकाला नुकसान झाले घटनेची माहिती रेल्वे पोलीस व देवळी पोलिसाला मिळतातच परंतु यवतमाळ जिल्ह्यातील ऐका माजी मंत्र्याने तेथून जात असताना रेल्वे पोलीस व देवळी पोलिसांना कारवाई न करण्याचा दबाव आणला कारण की रेल्वे खांब्याचे नुकसान झाले त्यामुळे गुन्ह्याची नोंद होणे आवश्यक होती परंतु राजकीय तशे काही होऊ शकले नाही.गाडी चालविणाऱ्या महिला अधिकाऱ्याकडे गाडी चालवण्याचा परवाना होता की नव्हता याची सुद्धा चौकशी झाली नाही हेच जर कोणत्याही जनसामान्य व्यक्तीकडून घडले असते तर देवळी पोलीस व रेल्वे पोलीसांणी अशेच केले असते का अशी चर्चा सध्या देवळी शहरात सुरू आहे.या अपघाताच्या वेळी देवळीचे तहसीलदार व अन्य कर्मचारी सुद्धा घटनास्थळी गेले होते अशे प्रत्यक्ष दर्शी लोकांनी सांगितले. यापुढे रेल्वे पोलीस व देवळी पोलीस राजकीय दबावाखाली झुकते का कारवाई करते याकडे देवळीकरांचे लक्ष लागले आहे. (क्रमशःभाग दोन मध्ये नाव व व्हिडीओ सहित बघत राहा साहसिक news -/24 सागर झोरे देवळी वर्धा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!