माहिती अधिकारात अपूर्ण उत्तर; नागरिकाने राज्य माहिती आयोगाकडे धाव घेण्याचा निर्णय

0

🔥माहिती अधिकारात अपूर्ण उत्तर; नागरिकाने राज्य माहिती आयोगाकडे धाव घेण्याचा निर्णय

यवतमाळ -/ यवतमाळ येथील तेजस राजेश चव्हाण यांनी जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेकडे माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत वाहन जप्ती, दंड आकारणीची प्रक्रिया, जप्त वस्तू परत देण्याची कार्यपद्धती तसेच मागील दोन वर्षांतील कारवाईची माहिती मागितली होती.
मात्र, प्राप्त उत्तरात अनेक प्रश्नांना केवळ “संबंधित कायद्यात नमूद आहे” असे सर्वसाधारण उत्तर देण्यात आले असून संबंधित नियम, परिपत्रके किंवा प्रमाणित कागदपत्रांच्या प्रती देण्यात आल्या नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. तसेच मागील दोन वर्षांतील जप्ती व दंडाची आकडेवारी “निरंक” असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
माहितीचा अधिकार कायद्याचा उद्देश नागरिकांना स्पष्ट, संपूर्ण व प्रमाणित माहिती उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे मिळालेले उत्तर अपूर्ण असल्याचे सांगत चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. माहिती आयोगाकडून संबंधित प्रकरणाची सुनावणी होऊन संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश मिळावेत, अशी त्यांची मागणी आहे.(क्रमशः)
         ब्युरो रिपोर्ट साहसिक              News-24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!