🔥कुख्यात गुटखा तस्कर कुमार ओछाणी अद्यापही फरार,स्थानिक गुन्हे शाखेसह शहर पोलीसांच्या कर्तव्यावर संशय.
🔥आरोपी कुमार ओछाणीच्या अटकेनंतर अनेक मोठे नेटवर्क उघडकीस येण्याची शक्यता
यवतमाळ -/ स्थानिक सिंधी कॅम्प पळसवाडी परिसरात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत २६ लाख ६३ हजार ५३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला आणि मानवी आरोग्यास अपायकारक असलेला सुगंधित तंबाखू व पानमसाला एका स्विफ्ट डिझायर कारमधून (किंमत ६ लाख) अवैध विक्रीसाठी वाहतूक केला जात होता. अन्न सुरक्षा अधिकारी जगदीश पंढरीनाथ कापसे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अलीम सलीम बेग उर्फ सोनू (रा. बाभुळगाव) व कुमार रामचंद्र ओछानी (रा. यवतमाळ) यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून १००५.३८ किलो तंबाखू आणि सीलिंग पॅकिंग मशीन जप्त केली मात्र या घटनेचा मुख्यसुत्रधार आरोपी कुमार ओछाणी हा पोलीसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाला त्यामुळे ही कारवाई केवळ कागदोपत्रीच करण्यात आली का असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.आरोपी कुमार ओछाणी यासह यवतमाळातील आणखी एका गुटखा तस्करांने त्याला पळवुन लावण्यास मदत केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे हा तस्कर सुद्धा पोलीसांना दरमहा 3 लाखाची रसद पुरवित असल्याचे आता पोलीस वर्तुळात उघड बोलले जात आहे.यवतमाळात कुख्यात दोन गुटखा तस्कर होते त्यापैकी एकावर शहर डिबी पथकाने कारवाई केली मात्र दुसरा अद्यापही पोलीसांच्या नजरेपासुन दुर आहे.वेळोवेळी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक चवरे हे कारवाई केल्याचा कांगावा करतात मात्र यावेळी कारवाई झाली मात्र आठवडा उलटुनही आरोपीला अटक करण्यास समर्थता दाखविली नाही त्यामुळे या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरत असल्याचे बोलले जात आहे.(क्रमशः)