🔥१२ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन दगडाने ठेचून हत्या करणारा संशायित आरोपी राहुल राजू मडावी ला पोलीसांनी घेतले ताब्यात.
🔥 या १२ वर्षीय चिमुकलीवर साहसिक संघटना कडून भावपुर्ण श्रद्धांजली
वर्धा -/ खेळण्या,बागडण्याचे वय असलेल्या अवध्या १२ वर्षीय चिमुकलीवर रोठा येथील नराधम राहुल राजू मडावी वय ३० वर्षे याला पोलसांनी खुन, बलात्कार, पास्को कायदयान्वये अटक केली आहे. दि. १५ जूलै रोजी सावंगी (मेघे) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शेतातील मजुराची मुलगी शाळेतून घरी आली आणि एका शेतातील घरात बालीकेचा निवस्त्र मृतदेह आढळून आला. या घटनेने गावात व वर्धा जिल्हयात सर्वत्र संतापाची लाट उसळली. कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावापासून काही दुर अंतरावर असलेल्या शेतात सदर मुलीवर लौगिंक अत्याचार करुन तिचा दगडाने ठेचून खुन करण्यात आला. घटना घडताच पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांनी १४ पथक तयार करून गुन्हयाचा तपास जलगतीने सुरु केला आहे. यामध्ये सायबर टिम, स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग, डीवायएसपीr सुनिल महाडिक यांनी विशेष तपास मोहिम राबविली असून संशयीत आरोपी राहुल राजू मडावी वय ३० वर्षे रा. रोठा याला अटक केली आहे. आज मुलीचे पोस्टमार्टम पुर्वी आरोपी नराधमाला अटक करण्याची मागणी जिल्हयातील युवकांनी लावून धरली होती. शासकीय ग्रामीण रुग्णालयात तरुण युवक यांनी आरोपीला फाशीची शिक्षा दया, आरोपीला अटक करा मगच पोस्टमार्टन करा यासाठी ठिय्या आंदोलन केले होते. अजुनही खर्या आरोपी पर्यंत पोलीस पोहचले नाही. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल अशी माहिती पत्रकार परिषद घेवून पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांनी माहिती दिली आहे.