🔥जश्न-ए-ईद मिलादुन्नबीनिमित्त शिवसेनेतर्फे फळ व पाणी वाटप.
हिंगणघाट -/ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने स्थानिक कारंजा चौक येथे जश्न-ए-ईद मिलादुन्नबी निमित्त मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत फळ व पाणी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी आमदार, माजी राज्यमंत्री तथा शिवसेना वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख *मा. श्री. अशोकभाऊ शिंदे** यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हाप्रमुख श्री. राजेंद्र खूपसरे, उपजिल्हाप्रमुख श्री. सतीश धोबे, तालुकाप्रमुख श्री. मनीष देवडे व शहरप्रमुख श्री. सचिन पोटदुखे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम उत्साहात पार पडला.
जश्न-ए-ईद मिलादुन्नबी हा इस्लाम धर्मातील पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा धार्मिक प्रसंग आहे. ईद मिलादुन्नबी किंवा मिलाद-उन-नबी या नावानेही हा दिवस ओळखला जातो. या दिवशी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जीवनकार्याचे, शिकवणीचे आणि मानवतेसाठी दिलेल्या संदेशाचे स्मरण केले जाते.
शांतता, प्रेम, दया, बंधुभाव, गरजूंची मदत, प्रामाणिकपणा आणि सर्वांशी सद्भावनेने वागणे हा त्यांच्या शिकवणीचा मुख्य संदेश आहे. समाजात एकोपा, बंधुभाव आणि परस्पर सद्भावना वाढावी, या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईद मिलादुन्नबीच्या शुभेच्छा देत फळ व पाणी वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख श्री. प्रकाश अनासाने, श्री. शंकर मोहम्मारे,गजानन काटवले,शितल चौधरी,हिरामण आवारी, सुनील आष्टिकर, गुणवंतजी वानखेडे, लक्ष्मण कापकर,दिलीप झोरे,प्रमोद ऍडलावर, दिलीप चौधरी,लक्ष्मण बकाने, भास्कर ठवरे,दिनेश धोबे,फिरोज पठाण, शेख वसीम,नितीन वैद्य,अतिक मिर्जा, चंगेश खान,अमोल वादाफडे,पप्पू घवघवे, निलेश भगत, अनंता गलांडे,विजय अष्टांकर, किशोर इंगोले,दिलीप वैद्य,नरेंद्र गुलकरी, संजय रहाटे, राहुल मोहितकर,गुड्डू डहाके,भास्कर भिसे, अशोक भोसले, ,प्रमोद खडतकर,अविनाश धोटे, आशिष वाघ,भोला ठाकूर, मोंटी मूडतकर,सुरेश लडी,आशिष भांडे,अशोक बावणे,बलराज डेकाटे,मिलिंद खंगण,…… यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.