स्वतंत्र व निडर पत्रकारितेसाठी जाकीर हुसैन यांना ‘बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार’

0

🔥स्वतंत्र व निडर पत्रकारितेसाठी जाकीर हुसैन यांना ‘बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार’

🔥जालना येथे नवव्या आंतरराष्ट्रीय पत्रकार सन्मान व दीक्षांत समारंभात राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते गौरव

आर्णी -/ स्वतंत्र, निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता तसेच सामाजिक कार्य आणि समाजाप्रती पूर्ण निष्ठेने व निःस्वार्थ भावनेने केलेल्या सेवांची दखल घेत आर्णी येथील इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सैय्यद जाकीर हुसैन यांना प्रतिष्ठेचा ‘बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने जालना, महाराष्ट्र येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘नवव्या आंतरराष्ट्रीय पत्रकार सन्मान व दीक्षांत समारंभात’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरेशी यांच्या हस्ते जाकीर हुसैन यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणे, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या शासन-प्रशासनापर्यंत पोहोचविणे, सामाजिक विषयांवर सातत्याने आवाज उठविणे तसेच समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्याची या पुरस्कारासाठी विशेष दखल घेण्यात आली.यावेळी प्रमुख वक्ते अशोक वानखेडे (वरिष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक दिल्ली) यांनी पत्रकारितेचे सामाजिक उत्तरदायित्व अधोरेखित करत स्वतंत्र, निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता ही लोकशाहीचा मजबूत आधारस्तंभ असल्याचे सांगितले. पत्रकारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्य आणि जनहिताच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरैशी यांनी स्वतंत्र, निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता ही लोकशाहीची मजबूत आधारशिला असून, पत्रकारांनी सत्याच्या बाजूने उभे राहून समाजातील प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे, असा संदेश दिला.बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार मिळाल्याबद्दल जाकीर हुसैन यांचे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे.“हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नसून समाज आणि पत्रकारितेप्रती असलेली जबाबदारी अधिक प्रामाणिकपणे पार पाडण्याची प्रेरणा आहे. भविष्यातही सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आणि सत्याच्या बाजूने माझी लेखणी निडरपणे सुरू राहील,” अशी भावना जाकीर हुसैन यांनी व्यक्त केली.

           ब्युरो रिपोर्ट साहसिक       News-/24 आर्णी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!