🔥रेड क्रॉस सोसायटी आर्वी व मॉडेल हायस्कूल रोहणा च्या वतीने दंतरोग तपासणी शिबिर संपन्न – स्व. अॅड. भैय्यासाहेब काळे यांना अभिवादन
🔥चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन व ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत वृक्षारोपण – विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन
कारंजा (घा.)-/ मॉडेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, रोहणा येथे दिनांक २१ ऑगस्ट २०२६ रोजी शुक्रवारला स्व. अॅड. दिलीपराव उपाख्य भैय्यासाहेब काळे यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त मॉडेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय रोहणा व इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने दंतरोग तपासणी शिबिर तसेच वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.सर्वप्रथम स्व. भैय्यासाहेब काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य राजेंद्र माधवराव सुपनर, श्री. विनयजी गुडधे, डॉ. अभिलाष धरमठोक, डॉ. भूषण अग्रवाल, डॉ. अमन ठाकरे, डॉ. उमेश गुल्हाने, डॉ. देवेंद्र खंडेलवाल, डॉ. सुभाष बुधवानी, श्री. राजेंद्रजी तेलरांधे, डॉ. सतीशराव ठाकरे, प्रेमसिंग राठोड, रमेशराव जवंजाळ, सुरेशराव काने उपस्थित होते.या प्रसंगी वर्ग ९ ते १२ च्या सर्व विद्यार्थ्यांची दंतरोग तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर डॉ. धरमठोक व डॉ. भूषण अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना दंत आरोग्य व सर्वसाधारण आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य राजेंद्र सुपनर यांनी विद्यार्थ्यांनी आरोग्य विषयक विविध समस्यांची योग्य वेळी काळजी घेणे गरजेचे आहे, असे विचार मांडले.शाळेच्या वतीने प्राचार्यांच्या हस्ते उपस्थित डॉक्टरांचे शाल, मोमेंटो व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.स्मृतिदिनाचे औचित्य साधून ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत शालेय परिसरात वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवीण शिरपूरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कु. अंजली रघाटाटे, अभिजीत काळे, मनीष सावरकर, लक्ष्मण कुंबरे, सुदर्शन शिंदे, पी. एस. झुटी, अमोल नागपुरे, संगीता कुडे, प्रतिभा गेडाम, आतिश निंबाळकर, रामदास मडावी, निलेश नाखले, अजय देशमुख, अरुण लंबे, भारती उईके, वैष्णवी कैलुके, सीमा बोबडे, मंजुषा कडू, सुगत फुलेले, हरीश पांडे, विजय नानवानी, दिवाकर पाटील या सर्वांनी अथक परिश्रम घेतले.