आष्टी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक हेमंत वांढरे यांच्या कार्यशैलीमुळे उपस्थित ग्राहक झाले भाऊक

0

🔥आष्टी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक हेमंत वांढरे यांच्या कार्यशैलीमुळे उपस्थित ग्राहक झाले भाऊक

साहुर शरद वरकड -/ वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असतांना दिपाली ठाकरे ही ग्राहक आपल्या छोट्याशा बाळाला घेऊन आपल्या सासू सोबत बँकेत आली असता रांगेत उभी राहिली बाळ रडत असल्याने सासूने सांभाळण्याचा प्रयत्न केला परंतु छोटसं बाळ मात्र रडतच होतं शेवटी बँकेच्या बाहेर जाऊन बाळाला रडण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु आईविना बाळ राहत नसल्याने रडणे चालूच होते अशा परिस्थितीत व्यवस्थापक हेमंत वांढरे आपल्या केबिनच्या बाहेर येऊन त्या बाळाच्या आईचे नाव विचारले आणि तिला रांगेतून आवाज देऊन आपल्या केबिनमध्ये बोलावले एका मिनिटाच्या आत त्या माऊलीचे काम पूर्ण केले आणि बाळाला जवळ घ्या म्हणत बाळाकडे बघितले अशा प्रकारचे सर्व चित्र ग्राहकांनी आपल्या नजरेने पाहिले एका मिनिटात बाळ शांत झाले आणि बँकेत शांतता पसरली हे चित्र पाहून उपस्थित ग्राहक भाऊक झाले अशा प्रकारचे अधिकारी जर प्रत्येक कार्यलयात राहिले तर प्रत्येकाला न्याय मिळाल्यासारखा वाटतो ही माणुसकी आजही जिवंत आहे याचे उत्तम उदाहरण व्यवस्थापक हेमंत वांढरे यांच्या कार्यातून दिसून आले हे विशेष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!