मानसिक छळामुळे माझ्या पतीचा मृत्यू. वनश्री गोडघाटे

0

🔥मानसिक छळामुळे माझ्या पतीचा मृत्यू. वनश्री गोडघाटे

🔥डॉ हेडगेवार ग्रामीण अर्बन सहकारी पतसंस्थेवर केले मानसिक छळाचे आरोप

देवळी -/ नाचणगाव येथील डॉक्टर हेडगेवार ग्रामीण अर्बन सहकारी पतसंस्था मर्या. नाचणगाव ता.देवळी जिल्हा वर्धा या पतसंस्थेकडून २०२२ मध्ये पाच लाख ३५ हजार पाचशे रुपये कर्ज घेतले होते. परंतु त्याच वर्षी माझे पती स्वर्गीय आशिष बाबाराव गोडघाटे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला त्यामुळे कर्ज भरण्यास उशीर झाला त्यानंतर पतसंस्थेने माझा सारखा मानसिक छळ करून माझ्या नावाचा कर्जाचा लाऊड स्पीकर गावातील घुमविले आणि अनेक प्रकारच्या धमक्या देऊन माझा मानसिक छळ सुद्धा केला या याविषयीची तक्रार मी पुलगाव पोलीस स्टेशनला सुद्धा दिली आहे.त्यामुळे कायदेशीर या पतसंस्थेवर मानसिक छळाचा गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी वनश्री आशिष गोडघाटे यांनी केली आहे.

              मिळालेल्या माहितीनुसार वनश्री गोडघाटे यांच्या पतीने घर बांधण्याकरिता डॉक्टर हेडगेवार ग्रामीण अर्बन डॉक्टर हेडगेवार सहकारी पतसंस्था नाचणगाव येथून कर्ज घेतले होते.परंतु या कर्जाच्या तकाद्या पायी त्यांना अचानक हृदयविकाराच्या झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.परंतु जे कोणी पतसंस्थेतून कर्ज घेते त्यांचा विमा काढण्यात येतो जर त्यांच्या जीवाला काही झाले तर विमा च्या माध्यमातून ही रक्कम कर्जदार घेतात आणि आपले कर्ज चुकते करतात परंतु या या पतसंस्थेने माझ्या पतीचा कोणत्याही प्रकारचा विमा काढलेला नाही ही त्यांनी केलेली घोळ चूक आहे त्यामुळे कर्जाची रक्कम भरण्यात उशीर होत आहे. माझे दोन लहान मुले आहेत माझ्या पती नंतर त्यांना पालन पोषणाची जबाबदारी आता माझ्यावर आलेली आहे.आणि त्यातच हे पतसंस्थे वाले माझा मानसिक छळ करून कर्ज भरण्याकरिता माझ्यावर दबाव टाकत आहे आणि रात्री सात आठ वाजता पतसंस्थेच्या ऑफिसमध्ये बोलून माझा मानसिक छळ करतात त्यामुळे या संस्थेच्या मानसिक छळाला कंटाळून मी शासनाला विनंती करतो की अशा बेकायदेशीर कर्ज वसूल करणाऱ्या संस्थेवर कायदेशीर कारवाई करून मला न्याय द्यावा अन्यथा मला दुसरे पाऊल उचलावे लागेल.(क्रमशः)

सागर झोरे साहसिक News-/24 देवळी,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!