सेलू -/ येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीत हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात स्थानिक पोलिसांना यश आले आहे. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी पाठपुरावा करून दोन हरवलेले मोबाईल शोधून काढले. त्यानंतर हे मोबाईल संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले.
यामध्ये सेलू येथील कैलास गोविंदराव मांढरे यांचा इनफिनिक्स कंपनीचा मोबाईल, तसेच हिंगणी येथील विजय पंढरी शेंडे यांचा व्हिवो कंपनीचा मोबाईल मिळून आला. पोलिसांनी दोन्ही मोबाईल तक्रारदारांच्या स्वाधीन केले.ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू पोलीस ठाण्याचे ठाणेदार पंकज वाघोडे आणि पोलीस अंमलदार ज्ञानदेव वनवे यांनी केली.हरवलेल्या मोबाईलचा शोध घेऊन ते नागरिकांना परत मिळवून दिल्याने संबंधित तक्रारदारांनी पोलिसांचे आभार मानले.