दैनिक साहसिक चा दणका,रावसाहेब पटवर्धन मल्टीस्टेट अर्बन बँक यवतमाळ चे अध्यक्ष सह सर्व संचालक यांना अटक

0

🔥हीच ती जोडी रावसाहेब पटवर्धन’ मल्टिस्टेटचा महाघोटाळाः अध्यक्ष आशिष सोमन, उपाध्यक्ष वैशाली पाटणेंसह संचालकांवर केली अटक ; १३५ ठेवीदारांचे कोट्यवधी हडप करून टोळी झाली होती पसार!🔥ह्याच त्या बँक च्या उपाध्यक्ष वैशाली पाटणे🔥हाच तो अनिल विठ्ठल बांद्रे🔥दैनिक साहसिक चा दणका,रावसाहेब पटवर्धन मल्टीस्टेट अर्बन बँक यवतमाळ चे अध्यक्ष सह सर्व संचालक यांना अटक,दिनांक ३ सप्टेंबर ला दैनिक साहसिक नी प्रकाशित केलेले वृत्त🔥हाच तो बँक चे अध्यक्ष आशिष सोमण🔥बँक लुटणारा हाच तो अतुल पाटणे🔥हाच तो अतुल रामदास महाजन संचालक

यवतमाळ -/सर्वसामान्य, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांनी भविष्यातील सुरक्षेसाठी ठेवलेले कष्टाचे पैसे एका रात्रीत गिळंकृत करणाऱ्या वित्तीय संस्थांच्या लुटीचा अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार – हिंगणघाट येथे उघडकीस आला आहे. ‘रावसाहेब पटवर्धन – मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड’ या पतसंस्थेच्या संचालक मंडळाने तब्बल १३५ ठेवीदारांना चुना – लावत २ कोटी ४१ लाख ५० 5 हजार रुपयांचा थेट गंडा घातला आहे.एवढेच नव्हे, तर बँकेच्या संचालक मंडळाने संगनमत करून तब्बल ३५ कोटी रुपये पारस्पर हडप केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या महाघोटाळ्यामुळे संपूर्ण वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच संस्थेचा मुख्य सूत्रधार अध्यक्ष आशिष भालचंद्र सोमन, उपाध्यक्ष वैशाली पाटणे या ‘च्यासह सर्व आरोपी संचालक भूमिगत झाले होते आज त्यांना पोलीसांनी मोठ्या शिताफीने अटक केली .हिंगणघाटात पतसंस्थेचे चकचकीत कार्यालय थाटून आकर्षक व्याजाचे आमिष दाखवत शेकडो नागरिकांकडून कोट्यवधींच्या ठेवी गोळा करण्यात आल्या होत्या. मात्र, ठेवींची मुदत संपल्यानंतर जेव्हा नागरिकांनी हक्काचे पैसे परत मागण्यास सुरुवात केली, तेव्हा पतसंस्थेच्या व्यवस्थापनाने हात वर केले. समीक्षा नंदकिशोर शिवणकर या ठेवीदार महिलेने आपल्या मुदत ठेवीचे (FD) ३ लाख ३१ हजार ३८७ रुपये काढण्यासाठी पतसंस्थेच्या दारात वारंवार चकरा मारल्या. मात्र, शाखेत निधीचा उपलब्ध नाही असे सांगून त्यांना प्रत्येक वेळी अपमानास्पद वागणूक देत हाकलून देण्यात आले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिवणकर यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसी खाक्या सुरू होताच अशा प्रकारे १३५ हून अधिक ठेवीदारांची २ कोटी ४१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे भयानक वास्तव समोर आले. प्राथमिक तपासात निष्पन्न झालेल्या धक्कादायक माहितीनुसार, हिंगणघाट शाखेत जमा झालेली सर्व रक्कम कोणत्याही नियमांची

पर्वा न करता नियमबाह्य पद्धतीने परस्पर यवतमाळ येथील मुख्य शाखेत वळवण्यात आली. पतसंस्थेच्या माध्यमातून तब्बल ३५ कोटी रुपयांची प्रचंड रक्कम अध्यक्ष आशिष सोमन आणि उपाध्यक्ष वैशाली पाटणे यांच्या संगनमताने परस्पर लाटण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

ठेवीदारांच्या डोळ्यांत धूळ फेकून एका शाखेतून दुसऱ्या शाखेत पैसे वळवायचे आणि नंतर ते स्वतःच्या घशात घालायचे, असा सुनियोजित कट या संचालक मंडळाने रचल्याचे उघड होत आहे. 

🔥आशिष सोमन, वैशाली पाटणेंचा ठेवीदारांच्या पैशांवर दरोडा!

🔥३५ कोटी परस्पर लाटले; ‘रावसाहेब पटवर्धन पतसंस्थे’ च्या संचालकांविरोधात हिंगणघाट पोलिसांत गुन्हा दाखल

 🔥हिंगणघाट शाखेतून परस्पर निधी यवतमाळला वळवून कोट्यवधींचा अपहार, आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना

गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच हे सर्व आर्थिक गुन्हेगार शहरातून पसार झाले होते . आपल्या कष्टाची आयुष्यभराचर्चा पुंजी अचानक बुडाल्याचे पाहून हिंगणघाट परिसरातील शेकडो ठेवीदारांचे धाबे दणाणले असून नागरिकांमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. या आर्थिक लूटप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी कठोर पावले उचलत पतसंस्थेचे अध्यक्ष आशिष भालचंद्र सोमन, उपाध्यक्ष वैशाली राजेश पाटणे यांच्यासह संचालक अनिल विठ्ठल बांद्रे, रुपेश जनार्धन येंडे, कीर्ती अतुल महाजन, सचिन पुंडलीक बनकर, राहुल शरद अडगुलवार, सारंग मुकुंद औदार्य, निलेश कैलाशचंद लश्करी, निखिलेश प्रकाश जोशी, संदीप शंकर जिरकर, नितेश विलास बेंद्रे आणि कुंदन बालकृष्ण चुलपार अशा एकूण १३ जणांवर फसवणूक, अफरातफर आणि आर्थिक गुन्हे

ठेवीदारांनी पतसंस्थेच्या कार्यालयाबाहेर गर्दी करत आरोपींना तात्काळ बेड्या ठोकून पैसे परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, हिंगणघाटचे ठाणेदार आणि वर्धा पोलिसांच्या गुन्हे शाखेची विशेष पथके पसार झालेल्या आशिष सोमन, वैशाली पाटणे व इतर फरार संचालकांच्या मागावर असून त्यांच्या संभाव्य अङ्कयांवर छापे टाकले जात आहेत. सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर आणणाऱ्या या भामट्यांची संपत्ती जप्त करून ठेवीदारांचे पैसे परत करावेत, अशी तीव्र मागणी आता जोर धरत आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!