विजयागोपाल ग्रामपंचायतीने काढले अकलेचे वाभाडे, मातीचा बांध रचून केले पाणी आडवाचे सोंग,तीन दिवसातच मातीचा बांध गेला वाहून 

0

🔥विजयागोपाल ग्रामपंचायतीने काढले अकलेचे वाभाडे, मातीचा बांध रचून केले पाणी आडवाचे सोंग,तीन दिवसातच मातीचा बांध गेला वाहून🔥जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाच्या सूचनांना दिली केराची टोपली,90 च्या दशकात शासनाने बांधला कोल्हापुरी बंधारा ठरतोय पांढरा हत्ती🔥देखभाल दुरुस्ती कडे अक्षम्य दुर्लक्ष,प्रशासक आणि ग्रामसेवक करतात मनमानी कारभार जनतेच्या कराचे पैसे घातले पाण्यात

🔥ग्रामपंचायतच्या मनमानीने गेले अमर्याद,लिटर पाणी वाया अचानक मातीचा बांध फुटल्याने पाण्याचा विसर्ग होत असल्याने जीवित हानी टळली

🔥कोणाचा जीव गेला असता तर जबाबदार कोण,दोषींवर कारवाई करा ग्रामस्थांची मागणी 

देवळी -/ तालुक्यातील विजयगोपाल येथील गाव नाल्यावर जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाने 90 च्या दशकामध्ये कोल्हापुरी बंधार्‍याची निर्मिती ही केली असून त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये दरवर्षी पाट्या टाकल्यावर सिंचनाची सोय व विहिरीची पाणी पातळी वाढवण्याची व जनावरांना पाणी पिण्याची सोय उदात्त हेतूने शासनाने बंधारा बांधला खरा परंतु निगरगट्ट कामचुकार अधिकाऱ्यांना याची काय देणे घेणे असा काहीसा प्रकार विजयगोपाल येथील नाल्यावर असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बाबतीत घडला आहे या बंधार्‍यावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्या टाकून पाणी अडवा अशा सूचना जिल्हा परिषदच्या लघु सिंचन विभागाकडून ग्रामपंचायतला प्राप्त झाल्याची माहिती होती आणि गावातील नागरिकांनी सुद्धा पाट्या टाकून पाणी अडवा याबाबत मागणी केली होती तू सप्टेंबर महिन्यापासून मागणी करून सुद्धा अन निनो चा प्रभाव लक्षात घेता दुष्काळत्ची सावट असताना सुद्धा अधिकारी कुंभकर्णी झोपेतून जागे झाले नाही आणि दोन महिने त्याच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही दोन महिन्यात नंतर कुंभकर्णी झोपेतून जागे झाले अधिकाऱ्यांनी स्वतःच्या मर्जीने कोल्हापुरी बंधाऱ्यासमोर मातीचा बांध रचून पाणी अडवाचे सोंग केले त्यामुळे दोन दिवस पाणी अडून राहिले तिसऱ्या दिवशी हा बांध फुटून वाहूनगेला अमर्याद पाणी वाहून गेले हा बांध फुटल्यामुळे पाण्याची पातळी एकाच वेळी नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ लागली परिसरात असलेले शेतकरी शेतमजूर जनावरे मुले कोणालाही जीवितव हाणी झाली नाही परंतु पाण्याचा प्रवाह एवढ्या गतीने होता की यामध्ये जर कोणी चुकिणे सापडली असती तर ती नक्कीच वाहून गेली असती या अधिकाऱ्याच्या मन मनमर्जी कारभारामुळे कोणाचा जीव गेला असता जबाबदार कोण असते मातीचा बंधारा टाकून पाणी अडवण्याचा प्रताप करणाऱ्या करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुरस्कारास द्यायला पाहिजे कारण मातीने पाणी अडवणे म्हणजे हा तर त्यांचा पराक्रमच आहे मातीने पाणी अडणार का हे त्यांना भनक नाही फक्त आपली मनमानी करायची वरिष्ठ कार्यालयांचा आदेश पायदळी तुडवायचा यांनी तर ठेकाच घेतला आहे लोकांच्या मागण्या फेटाळून लावायच्या त्यात तर ते पटाईत आहे मातीचा बांध रचल्यामुळे जनतेच्या कराचे पैसे तर वाया गेलेच अमर्याद लिटर पाणी वाया गेली शिवाय कुणाची जीवितहानी नाही झाली ते दैव बलतवर अशा निगरगट्ट मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यावर कर्तव्यात कसूर आणि भंगाची कारवाई झाली पाहिजे आणि कोल्हापुरी बांधाऱ्यावर पाट्या टाकूनच पाणी अडवावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.(क्रमशः)

सागर झोरे साहसिक News-/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!