गुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी रमेश पठाडे यांचे निधन
प्रतिनिधी /वर्धा :
जिल्हा परिषदेच्या वाढोणा शाळेचे केंद्रप्रमुख तसेच राष्ट्रसंत तुकडोजी विचार प्रतिष्ठानचे संचालक रमेश पठाडे यांचे मंगळवारी रात्री ह्रदय विकाराच्या तिव्र झटक्याने दु:खद निधन झाले. ते ५७ वर्षाचे होते. त्यांच्या मागे वडील, पत्नी, दोन मुले व मोठा आप्त परिवार आहे. आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी गुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सभेत श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे प्रा प्रशांत देशमुख ,शिक्षणाधिकारी वर्ग,,,नाकाडेजी,सतीश जगताप, दत्ता राऊत, विजय मंथनवार, शालिग्राम वानखेडे आदींनी आपल्या भाषणातून पठाडे यांच्या कार्याचा आढावा घेतला.