पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने केले दोन घाव ; पश्चाताप होताच पतीनं केली आत्महत्या

0

प्रतिनिधी / तळेगाव:

कौटुंबिक वादातून पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे उघडकीस आली आहे.
ही घटना सोमवारी सकाळी १० वाजता आष्टी येथील इंदिरानगरमध्ये घडली होती . जखमी मंगला सुरेश चांगोळे वय 38 वर्ष व पती सुरेश रामचंद्र चांगोळे ४० या दोघांचा काही दिवसांपासून कौटुंबिक वाद होत होता. सोमवारी सकाळी 10 वाजता दोघांमध्ये पुन्हा वाद झाला, यामुळे रागाच्या भरात सुरेशने पत्नी मंगला च्या डोक्यावर कुऱ्हाडीने दोन घाव केले, यामध्ये मंगला गंभीर जखमी झाली. ही घटना परिसरातील नागरिकांना कळताच याच माहिती मंगलाच्या भावाला दिली..त्यानी लगेच बहिणीचे घर गाठून तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. प्रथम उपचारानंतर मंगला ला अमरावती येथील रुग्णालयात पाठविण्यात आले.
याप्रकरणी मंगलाचा भाऊ अंकुश राऊत याच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिसांनी पती सुरेश चांगोळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलीस आरोपी पतीचा शोध घेत असतानाच पोलिस स्टेशन तळेगाव हद्दीत येणाऱ्या भारसवाडा शिवारात सुरेश याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली.. पोलिसांनी घटनास्थळ गाठुन मुतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविला… पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!