वर्ध्यात अधिकाऱ्याच्या बंगल्यावर चोरट्याने मारला नकली सोन्यावर ‘डल्ला’
साहसिक न्यूज24
Byप्रमोद पाणबुडे / वर्धा:
येथील पंचायत विभागाच्या उपमुख्याधिकारी ज्ञानदा फनसे यांच्या बंगल्यावर चोरी झाल्याची घटना आज बुधवार 10 रोजी उघडकीस आली. याप्रकरणी रामनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पंचायत विभागात नुकत्याच रुजू झालेल्या उपमुख्याधिकारी ज्ञानदा फनसे ह्या दिल्ली येथे गेल्या होत्या. जाताना त्यांनी सोन्याचे दागिने इतरत्र ठेवले होते. दरम्यान, बंगल्यावर कुणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी हात साफ करण्याचा प्रयत्न केला. बंगल्यातील कपाटातून चोरट्यांनी खरे असल्याचे समजून बनावट दागिने चोरून नेले. उपमुख्याधिकारी ज्ञानदा फनसे ह्या बुधवारी परत आल्यानंतर बंगल्यातील सामान अस्तव्यस्त झालेले आढळून आले. त्यावरून चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणाची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. त्यावेळी विक्रेती दागिने चोरी झाल्याचे फनसे यांनी सांगितले. पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत.