वर्ध्यात मालवाहक गाडीची उभ्या ट्रकला धडक ; २ गंभीर तर २ बालकांसह ६ जखमी
Byसाहसिक न्यूज24
प्रतिनिधी/ वर्धा:
हिंगणघाट उमरेड मार्गावरील धोंडगाव गावाजवळील टाटा मालवाहक गाडी चालकाचे स्टेरिंग वरून नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन रस्त्यांच्या दुसऱ्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर जाऊन आदळले या भिषण अपघात २ व्यक्ती गंभीर तर २ बालकांसह अन्य ६ जण किरकोळ जखमी झाले गंभीर जखमींना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले तर किरकोळ जखमीवर समुद्रपुर येथिल ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आला. प्राप्त माहितीनुसार नुसार रविवारी रात्री १ वाजताच्या सुमारास उमरेड कडून टाटा एस क्रमांक एम एच ३४ बि जी ६१९६ हा भरधाव वेगाने जामकडे जात असताना धोंडगाव गावाजवळील दयाशील मुनेश्वर यांच्या घराजवळ चालक इसाक रुस्तमखाँ पठाण, वय २८ राहणार वरोरा याचे वाहना वरुन नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन रसत्याच्या दुसऱ्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर जाऊन धडकले या अपघातात वाहन चालक इसाक रुस्तमखाँ पठाण,अविनाश कुमरे 31 वर्ष , रुखमा अविनाश कमरे वय 24 वर्षे, जेबा इसाक पठाण वय 30 वर्ष,शहारुख शगुफ्ता पठाण वय 21,अयाण इसाक पठाण वय 8, सोयब सत्तार पठाण वय 9 वर्षे सर्व राहणार वरोरा,नौशाद सत्तारखॉ पठाण वय 34 वर्ष,राहणार फुटाळा पडोली चंद्रपुर, हे जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनिल दहिभाते यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी संजय तिपार्टी, राहुल मानकर यांनी घटनास्थळी जाऊन सचिन तेलंग,निखिल थुटे,प्रशांत ठाकूर,नितेश बहादूरे,सुरज कुबडे, मुनेश्वर परीवारातील सदस्यांच्या मदतीने सर्व जखमींना उपचारासाठी समुद्रपुर येथे दाखल केले यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढिल उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. टाटा एस हा नागपूर वरून उमरेड,जाम मार्ग चंद्रपूर येथे परत जात होता अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.या अपघाता संबंधी टाटा एस चालक इसाक रुस्तमखाँ पठाण, वय २८ राहणार वरोरा याचे विरोधात गिरड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.