पोस्टातील कर्मचाऱ्याने दिली शेतकऱ्याला अपमानास्पद वागणूक.
देवळी : हल्ली पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा निधी जमा करण्याकरिता पोस्ट ऑफिस मध्ये खाता काढणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने स्थानिक पोस्टमध्ये जाऊन आपले खाते काढण्याची धडपड करीत आहे.गुरुवारी पी एम किसान योजनेचे खाते काढण्याकरिता शेवटची तारीख असल्याने शेतकरी पोस्टकडे जात होते परंतु देवळी पोस्ट ऑफिस चे पोस्टमास्टर ज्ञानेश्वर थूले यांनी ईसापुरचे शेतकरी नरेश ढोकणे यांना आज खाते होत नाही, आमचे कर्मचारी जागेवर नाही, तुम्हा सर्व शेतकऱ्यांना की एकच दिवस मिळतो का खाते काढायला, आल्याबरोबरच खाते निघेल का, अशा अनेक गोष्टी करून त्यांना पोस्टामध्ये अप्पानस्पद वागणूक दिली तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे जा आज खाते निघणार नाही आणि जिथे तक्रार करायची असेल तिथे तक्रार करा अशी धाक दप्पट करून पोस्टातून हकलून लावले आपल्या अपमानाने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी देवळीतील मुजोर पोस्ट कर्मचाऱ्यावर शासनाने कायदेशीर कारवाई करावी अशी शासनाला विनंती केली आहे.
आज पीएम किसान योजनेची खाते काढण्याची शेवटची तारीख असल्याने मी पोस्टात गेलो असता पोस्टमास्टर ने मला अपमानास्पद वागणूक दिली व अनेक प्रकारच्या गोष्टी सांगून मला पोस्टातून हाकलून लावले जिथे जायचे असेल तिथे जा तिथे तक्रार करायची असेल तिथे तक्रार करा अशा मुजोर पोस्ट कर्मचाऱ्यावर शासनाने कारवाई करावी तसेच पी एम किसान योजनेच्या आर्थिक लाभापासून मी जर वंचित राहिलो तर याची जबाबदारी देवळीतील पोस्ट कर्मचाऱ्यावर राहील.
शेतकरी नरेश ढोकणे ईसापुरसागर झोरे साहसिक न्यूज/24देवळी