आमदाराच्या लेखी आश्वासनानंतर भालेराव परिवाराचे आमरण उपोषण मागे.
अतिक्रमण केलेली घरांची जागा जिल्हा धिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन जागेचा विषय निकाली काढणार,आ. दादाराव केचे.
आष्टी शहीद : आष्टी तालुक्यातील माणिकनगर ग्रामपंचायत समोर दि.५जानेवारी पासून भालेराव परिवाराचे हक्काची जागा व हक्काचे घरकुल मिळावे म्हणून आमरण उपोषण सुरु होते.चार दिवसाच्या अथक परिश्रमानंतर आमदार दादाराव केचे यांनी दखल घेतली आणि उपोषण स्तळं गाठले आणि उपोषण कर्त्यांची भेट घेत चर्चा केली.निंबू पाणी देऊन उपोषण सोडण्यात आले.
सविस्तर असें कि,माणिकनगर ग्रामपंचायत समोर भालेराव परिवारातील तुळशीराम भालेराव, सिंधू उर्फ पुष्पा भालेराव,सीमा भालेराव, गजानन भालेराव व दोन वर्षची चिमुकली तुप्ती हे दि.५जानेवारी पासून हक्काची जागा व हक्काचे घरकुल मिळावे म्हणून आमरण उपोषण सुरु केलें होते.चार दिवस झाले तरी प्रशासनाचा कोणताही अधिकारी उपोषण मंडपात आला नाही.यां उपोषण कर्त्या मध्ये नऊ महिने ची गर्भवती आमरण उपोषण करित होती.प्रकुर्ती अचानक आवक्याबाहेर गेल्याने गर्भवती महिलेला आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलें होते. तेथेही त्या महिलेने आमरण उपोषण सुरूच ठेवले होते. दि.८रोजी सुट्टी घेऊन पुन्हा ती महिला उपोषण स्तळी दाखल,झाली होती. लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार भालेराव परिवाराणे घेतला होता. परिस्थिती अधिका बिघडू नये म्हणून आमदार दादाराव केचे यांनी तोडगा काढण्यासाठी आटोकात प्रयत्न केलें. शेवटी भालेराव परिवारानें लेखी पत्र लिहून घेत आमरण उपोषण मागे घेतले. आमदार दादाराव केचे यांनी उपोषण कर्त्यांना निंबू पाणी देऊन उपोषण सोडले.यावेळी पंचायत समिती चे विस्तार अधिकारी प्रदीप चव्हाण, नायब तहसीलदार दीपक काळुसे, ग्रामसेवक चेतन मुंडे, सरपंच लक्समि सनेसर, तालुका अध्यक्ष कमलाकर निंभोराकर,अमोल पवार माजी उप सरपंच देविदास पाथरे, माजी सरपंच लक्समन धुर्वे, दशरथ गेडाम, आरोग्य कर्मचारी संगीता मसराम, अशावरकर विद्या केचे, पोलीस उप निरीक्षक राजेश उंदीरवडे, हे हजर होते.उपोषण कर्त्यांनी सर्वांचे अभिनंदन केलें.
नरेश भार्गव साहसिक न्यूज /24 शहीद आष्टी