बंद पडलेली जनावरांची पिकप तळेगाव पोलिसांच्या जाळ्यात.
नागपूर अमरावती मार्गाने जात असताना इंदरमारी फाट्यावर बंद अवस्थेत पडली होती जनावरांची पिकप.
वर्धा : आठ जानेवारीच्या मध्ये रात्री तळेगाव पोलीस गस्त लावत असताना इंदरमारी फाट्याजवळ रात्री बारा वाजताच्या दरम्यान ग्रस्त साठी तळेगावचे पोलीस अनिल ढाकणे चेतन नाईकवाडे व निखिल काळे हे गस्त मारत असताना अनिल ढाकणे याचे लक्ष रोडच्या बाजूने असलेल्या पिकप क्रमांक एम एच २७ बी एक्स 25 61 यावर पडले त्यात त्यांनी त्या पिकप ची तपासणी करायला लागले ते पिकप वाहन समोरून कुठेतरी ठोकले होते हे पाहिल्यानंतर त्यांची शंका आणखी वाढली की गाडीमध्ये ड्रायव्हर दिसत नाही नंतर त्यांनी गाडीची झेडपी घेतली त्यामध्ये जनावरे 12 ते 13 कोंबून अवस्थेत असलेले दिसले हे पाहून त्यांनी गावातील बजरंग दल च्या काही मुलांना बोलावून त्या जनावरांना व्यवस्थितरित्या बाहेर काढले त्यानंतर सकाळी तळेगावातील बजरंग दलाचे मुल ईश्वर सहारे अक्षय पचारे आशिष घोडे नीरज इथापे हर्षल पचारे अभिजीत शेंडे राहुल गजम स्वप्निल इंगळे पिंटू सोनटक्के गौरव कुंबरे यांच्या मदतीने दुसरा वाहनांमध्ये व्यवस्थितरीत्या त्यांना बसून टाकरखेडा येथील श्री संत लहानुजी महाराज देवस्थान गौरक्षण येथे नेण्यात आले त्यामध्ये दोन ते तीन जनावरे किरकोळ जखमी अवस्थेत होते पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहे.
गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज/24 वर्धा