सैराट वाहन चालकावर कधी होणार कारवाई.
वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
देवळी : शहरातील अतिक्रमणामुळे त्रासदायक असताना काही युवक आपल्या दुचाकी सैराट प्रमाणे वेगाने चालवण्याचा नित्य नियम बनलेला आहे काही युवक शाळा संपन्याच्या वेळेला विद्यार्थ्यांच्या अधून मधून वेगाने गाडी चालवणे ट्रिपल सीट नेने,नागमोडी पद्धतीने चालविणे,तसेच आंबेडकर पुतळा ते बस स्थानक या मार्गावर सैराट वेगाने चालविण्याची दु चाक्यांची रेस लागलेली असते, त्याच बाजूला नगरपरिषद प्राथमिक शाळा व, नगरपरिषद ज्युनिअर कॉलेज, सुटल्यानंतर काही विद्यार्थी मागच्या रस्त्याने घरी जाण्याकरिता हा रस्त्याचा उपयोग करीत असते या रस्त्यावर सारखी लोकांची व वाहनांची वर्दळ असते तरीसुद्धा काही सैराट युवक या मार्गावर बेधुंद अवस्थेत वेगाने गाडी चालवत असतात असला प्रकार दररोज शहरात पाहायला मिळत आहे.परंतु वाहतूक पोलीस फक्त बघायची भूमिका घेत असल्याने सैराट वेगाने गाडी चालवणाऱ्या काही अल्पवयीन युवकाची हिम्मत वाढलेली दिसत आहे. त्यांना कायदा नावाची कोणतीच भीती त्यांना वाटत नाही त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अशा सैराट वाहन चालकावर त्वरित कायदेशीर कारवाई करून होणारी दुर्घटना टाळावी असे शहरातील नागरिकांची मागणी होत आहे.तरी वरिष्ठ वाहतूक अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी अशी शहरातील नागरिकांची अपेक्षा आहे.
सागर झोरे साहसिक न्यूज/24