मतीमंद मुलीचा विनयभंग करणाऱ्यास सश्रम कारावास..
दहा हजाराचा दंडही ठोठावला.
प्रथम श्रेणी न्यायाधीशांचा निकाल.
शहीद आष्टी : मतिमंद मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
प्रथम श्रेणी न्यायाधीश एफ.टी. शेख सो. यांनी हा निकाल दिला असून मनोज फंतुजी सनेसर रा. माणिकवाडा ता. आष्टी जि. वर्धा असे शिक्षेस पात्र ठरलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
त्यास भादविच्या कलम 354 अंतर्गत तीन वर्षाचा सक्षम कारावास व दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणातील पिडीता ही जन्मतः मतिमंद आहे.पिडीता ही आठवडी बाजारात फिरत असताना आरोपी याने तिला खर्रा घेण्याचे निमित्ताने जवळ बोलून तिचा विनयभंग केला. सदर गंभीर प्रकरणी तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार गणेश झोरे यांनी केला. शिवाय प्रकरण न्यायप्रविष्ट केले. तक्रारदाराची बाजू सरकारी वकील उमेश सोरते, सारीका दंभे व जयश्री काळे यांनी न्यायालयात मांडली. पैरवी अधिकारी म्हणून दिनेश काळे यांनी काम पाहिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीशांनी आरोपीस दोषी ठरवून शिक्षा ठोठावली आहे.
नरेश भार्गव साहसिक न्यूज/24 वर्धा.