परळीत दोन दिवस केंद्रसरकारच्या महागाई धोरणा विरोधात काँग्रेसचे जन जागृती अभियान
प्रतिनिधी / परळी :
परळी शहरांमध्ये काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या महागाई विरोधात जनजागृती अभियान सुरू करण्यात आले असून हे आदोलन अभियान दोन दिवस राबवण्यात येणार आहे .वाढत्या महागाई बद्दल आणि इतर मुद्यांना घेऊन परळी काँग्रेस कमिटीच्या वतीने हे आंदोलन सुरू करण्यात आले.केंद्र सरकारच्या चुकीचे धोरण आणि हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याचा आरोप करत परळीचे शहराध्यक्ष सय्यद हनीफ सय्यद यांच्या नेतृत्वात पुढील दोन दिवस हे जागृती अभियान सुरू असणार आहे. परळी शहरातील प्रत्येक ठिकाणी जाऊन जनजागृती अभियान करणार असल्याचं काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूर यांनी सांगितले आहे. या अभियानात काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.