मंगरूळ येथे महर्षी वाल्मीक ऋषी जयंती व मच्छिंद्रनाथ महोत्सव उत्साहात साजरा…
सिंदी (रेल्वे) : महर्षी वाल्मिकी व मच्छिंद्रनाथ महोत्सव यानिमित्त आयोजित समाज प्रबोधन मेळावा मंगरूळ तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा येथे नागपूर विभागीय अध्यक्ष पंकज बावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच राजू बावणे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष समाज क्रांती दल महाराष्ट्र प्रदेश यांच्या अध्यक्षतेखाली मंगरूळ गावातील तसेच समुद्रपूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात समाजबांधवांच्या उपस्थितीत सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला.सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून भोई समाज क्रांती दल नागपूर विभागीय अध्यक्ष महिला जोस्नाताई कंडे, महिला समुद्रपुर तालुका अध्यक्ष सारिका पोइनकर, उबदा शाखा महिला वैशाली मेश्राम, चित्राताई भोयर, भा.ज. पा. मच्छिमार सेल वर्धा जिल्हा उपाध्यक्ष गजानन इशनकर, वाल्मीक कंडे, विलाश मेश्राम, भाजपा मच्छीमार सेल सिंदी शहर अध्यक्ष प्रशांत कोल्हे, विनोद दाते आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच गिरड पोलिस स्टेशनचे ठाणेदार गाडे यांची विशेष उपस्थिती होती.महर्षी वाल्मीक ऋषी व स्वामी मच्छिंद्रनाथ महाराज यांचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. भोई समाज क्रांतीदल विभागीय अध्यक्ष तथा भाजपा मच्छीमार सेल वर्धा संयोजक पंकज बावणे यांनी आपल्या समाज बांधवांनी केलेल्या विनंतीस मान ठेवत आपल्या प्रबोधन पर उदबोधनातुन, समाज संघटित करून समाजाला आरक्षण व शैक्षणिक वृत बळकट कसे बनवता येईल यावर मार्गदर्शन केले. तसेच लालनाला जलाशयाच्या संस्थाची चौकशी लावण्यासाठी विशेष लक्षपुर्वक प्राथमिक तत्वावर प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. समाज बांधवांना कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर निःसंकोचपणे मदतीचा हात देण्यासाठी सदैव तत्पर असल्याचेही बावणे म्हणालेत. प्रबोधन सोहळा आटोपून स्नेह भोजनाची व्यवस्था मंगरूळ गावातील समाज बांधवांनी केली.२३जानेवारी ला भजन कीर्तन संस्कृत स्पर्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्याच प्रमाणे २४ जानेवारी रोजी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले तथा वाल्मीक ऋषी, शिवशंकर भगवान, तुकडोजी महाराज यांच्या हुबेहूब प्रतिमा बनवण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगरूळ गावातील समाज बांधवांनी मोलाचे परिश्रम घेतले. कार्यक्रमाचं सुत्रसंचलन किशोर तांदुळकर यांनी केले.
दिनेश घोडमारे सहासिक न्यूज /24 सिंदी रेल्वे