श्री जय भवानी माता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची मुख्याधिकारी नगर परिषद कडे परत एकदा मागणी.
हिंगणघाट / शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी चिपकविण्यात येणाऱ्या पाॅम्पलेट विरोधात अत्यंत कठोरपणे दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन श्री जय भवानी माता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद हिंगणघाट यांना करण्यात आले.हिंगणघाट शहरातील विविध सार्वजनिक ठिकाण जसे बसस्थानक, रेल्वे स्टेशन, विविध चौक, तहसील कार्यालय, सर्व सरकारी इमारती व वैयक्तिक प्रतिष्ठानच्या ठिकाणी विनापरवानगीने अवैधरित्या विविध बाबींचे जाहिरातीचे पाॅम्पलेट चिपकविण्यात येत असतात,एकावर एक असे कितीतरी पाॅम्पलेट चिपकवुन ती जागा विद्रुप करण्यात येत असते. परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने पाॅम्पलेट चिपकविण्यात अत्यंत निर्ढावलेले आहेत.त्यामुळे करोडो रुपये खर्च करून शासनाच्या व आपल्या “स्वच्छ हिंगणघाट सुंदर हिंगणघाट” या हिंगणघाट शहराला सुंदर करण्याच्या योजनेचा/उपक्रमाचा पार बट्ट्याबोळ झालेला दिसत आहे, ही बाब लक्षात आणून देत अशा अवैध पाॅम्पलेट चिपकविणा-यांच्या विरोधात अतिशय कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक, पर्यावरण, वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या व हिंगणघाट शहर स्वच्छ व सुंदर असावं आणि दिसावं ही सात्विक भावना घेऊन कार्य करणाऱ्या श्री जय भवानी माता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गायकवाड साहेब,मुख्याधिकारी ,नगर परिषद हिंगणघाट यांना करण्यात आली. यावेळी त्यावर मुख्याधिकारी साहेब उपस्थित नसल्याने प्रशासकीय अधिकारी डबडगे साहेब, शिंदे साहेब, विशालजी ब्राम्हणकर व प्रविणभाऊ काळे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मनाई फलकासह,संबंधितांवर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी संस्थेच्या वतीने यापूर्वी सुद्धा याबाबत निवेदन दिले असून त्यावर नगर परिषद हिंगणघाट कडुन कुठलीही कारवाई न झाल्याचे सांगण्यात आले. आतातरी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी करण्यात आली.यावेळी निवेदन देतांना सार्वजनिक ठिकाणी,चौकात व नगर परिषदेच्या वतीने सुशोभिकरण केलेल्या जागी कशारीतीने विद्रुपीकरण करण्यात आले हे फोटोसहीत निदर्शनास आणून देण्यात आले.
यावेळी निवेदन देतांना प्रामुख्याने संस्थेचे गुणवंतभाऊ ठाकरे, किरणभाऊ शिवणकर, अशोकभाऊ डेकाटे,धनराज कुंभारे, नरेंद्रभाऊ मानकर,उमेश डेकाटे, सचिन ऐलकुंचेवार, योगेश बाकरे, मयुर बासनवार, कार्तिक काटकर इत्यादी सदस्य उपस्थित होते.