देवळी /लॉयन्स ट्रॅडिशनल शोतोकान कराटे डो असोसिएशन इंडिया चे राष्ट्रीय सचिव कोईशी उल्हास वाघ यांचे प्रमुख मार्गदर्शनात शहीद हुतात्मा स्मारक पोलीस मुख्यालय जवळ वर्धा येथे नुकतीच जिल्हास्तरीय कराटे बेल्ट परीक्षा संपन्न झाली.त्यामध्ये स्थानिक नॅशनल कराटे मार्शल आर्ट ट्रेनिंग सेंटर चे कराटे खेळाडू गौरव ढोकणे यांनी कराटे क्षेत्रातील सर्वोच्च पदवी ब्लॅक बेल्ट प्राप्त करून देवळी गावाचे नाव उंचाविले या त्याच्या उपलब्धी बद्दल त्याला कोईशी उल्हास वाघ व सेन्साई अनुप कपूर यांचे द्वारा ब्लॅक बेल्ट व पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तेव्हा सत्कार समारंभात मार्गदर्शन पर भाषणात ते म्हणाले की प्रयत्नशीलच यशाला गवसनी घालू शकतो असे मत व्यक्त करून त्यांनी सर्व यशस्वी खेळाडूंना उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या.गौरव ढोकणे हा कराटे खेळाडू मागील दहा वर्षापासून ब्लॅक कमांडो मार्शल आर्ट असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष सेन्साई अनुप कपूर व नॅशनल कराटे मार्शल आर्ट ट्रेनिंग सेंटर देवळी चे प्रशिक्षक सेन्साई धनंजय कपूर यांचे मार्गदर्शनात नियमित सराव करीत असून विभिन्न कराटे स्पर्धेत सुद्धा त्याने यश संपादित केले आहे तो आपल्या यशाचे श्रेय सेन्साई अनुप कपूर सेन्साई धनंजय कपूर व आपल्या माता-पितांना देतो त्याच्या या यशाबद्दल सहयोगी कराटे पटू प्रांजली बोरकुटे, कृपा देशमुख ,आर्या ठाकरे, सुजल थुटे ,प्रखर देशमुख ,आतिश तुरक यांनी अभिनंदन केले आहे.