बाबासाहेबांचे चिंतन व लेखन अनेक पिढ्याना नवी दृष्टी व दिशा देणारे ठरतील-रवींद्र पावडे.
साटोडा / येथे जि प उच्च प्राथमिक शाळा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पावडे ,प्रमुख अतिथी अरुणा हजारे,नितेश आडे,जयवंता नेवारे व विद्यार्थी उपस्थित होते.सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पूजन व पुष्पमाला अर्पण करण्यात आली.
तसेच वर्ग ७ च्या विद्यार्थी नी कु.जान्हवी दुधकवले व लावण्या राऊत यांनी सुरेख “भीमगीत”सादर केले.
प्रास्ताविकातून अरुणा हजारे यांनी बाबासाहेबांनी विद्याठयांसाठी दिलेले मौलिक संदेश व समाजबांधव यांना दिलेले संदेश यावर मार्मिक विवेचन केले.तसेच विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासावी असे आवाहन केले.
नितेश आडे यांनी बाबासाहेबांनी बहुजन व दलितांसाठी काय कार्य केले ते विशद केले,असा युगप्रवर्तक नेता निर्माण होणे कठीण आहे,विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे आचार-विचार अंगीकृत करावे असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणातून रवींद्र पावडे यांनी बाबासाहेबांच्या जीवन-चरित्रावर प्रकाश टाकला,शैक्षणिक,सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला,बौद्ध धर्माचा स्वीकार का व कसा केला याचा पण परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नितेश आडे यांनी केले,खाऊ वाटून कार्यक्रमाची सांगता झाली.