हुदयविकाराच्या तीव्र झटक्याने ऐकूलत्या एक तरुणाचा मृत्यू,वर्धेपूर गावं हळहळले..
आष्टी शहीद / तालुक्यातील वर्धेपूर येथील आशिष ओंकारराव टेकाडे वय ३० वर्ष यां तरुणाचा.२ मे रोजी दुपारी ३ वाजता हुदयविकराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.मुतक आशिष च्या निधनाची वार्ता वर्धेपूर गावात येताच वर्धेपूर गावं हळहळले.
सविस्तर असें कि,आष्टी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणाच्या काठवर वसलेल्या वर्धेपूर येथील आशिष टेकाडे हा आई वडिलांना ऐकूलता एक मुलगा होता.शिक्षण पुर्ण, झाल्यावर त्याने पुणे गाठले तेथे तो टाटा मोटर्स यां कंपनीत कामाला होता. रोजगार मिळाला म्हणून त्याने विवाह करण्यासाठी वर्धेपूर गावं गाठले. नातेवाईक यांना घेऊन त्याने आष्टी तालुक्यातील वाघोली गावात मुलगी पसंत करून विवाह जोडला.२७जून रोजी लग्नाचा विवाह मुहूर्त काढला. लग्न असल्यामुळे आशिष नें घराचे रंगकाम सुरु केलें आणि दि.२ मे रोजी गावातील नातेवाईक श्री. गोहत्रे यांच्या कडे असलेल्या साक्षगंध यां कार्यक्रमात हजेरी लावली.साक्षगंध कर्यक्रम सुरु असताना आशिष च्या छातीत दुखणे सुरु झाले.ही बाब त्याने नातेवाईक यांना सांगितली आणि लगेच पुढील उपचारासाठी खाजगी वाहणानें वरुड येथे नेण्याची व्यवस्था करण्यात आली. साहूर गावं ओलांडताच आशिष टेकाडे यांनी जगाचा निरोप घेतला. आशिष च्या निधनाची वार्ता वर्धेपूर गावात येताच गावात हळ हळ व्यक्त होत होती. आशिष हा आई वडिलांना एक मुलगा होता. विवाह बांधणाच्या रेशीम गाठी बांधन्यापूर्वी नियतीने डाव साधला. गावातील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत संस्कार करण्यात आला. यावेळी गावकर्यांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा होत्या.