वीज प्रवाहाच्या धक्क्यानेमृतक मंगेश हातगरे वय ३८ वर्ष, सालोड गावातील पसरलेली शोककळा..
वर्धा – सालोड (हि.) / वर्धा जिल्ह्यातील सालोड हीरापुर येथे एका विवाहित तरुणाचा वीज प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने सालोड हिरापूर येथे शोककळा पसरली. सविस्तर असे की सालोड हिरापूर येथे मंगेश किसनराव हातगरे वय ३८ वर्ष या विवाहिताने नवीन घराचे स्वप्न घर कामाचे सुरुवात केली असता घराचे काम बांधकाम पूर्वताकडे येत असता घरावरील पाणी मारून घराचे बांधकाम परिपकव करण्याकरिता घरावर पाणी मारत असतांना अकस्मात घराला वीज प्रवाहाच्या मंगेशला आकस्मित धक्का बसल्याने त्याला उपचाराकरिता सावंगी मेघे रुग्णालय दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले वीज प्रवाहाचा एवढ्या जबरदस्त धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मागे आई,वडील,पत्नी व दोन लहान मूली असा आप्त परिवार आहे. तसेच सालोड हिरापूर येथे सर्वत्र शोककळा पसरलेली आहे.