गायन स्पर्धेत सानिका बोभाटे ने पटकाविला देशात द्वितीय क्रमांक…

0

   वर्धा – ग्रासहॉपर स्पोर्ट्स अँड एन्टरटेन्मेंट कॉर्पोरेशन यांच्या तर्फे मेगास्टार सिंगर इंडिया का चॅम्पियन ही ऑल इंडिया लेवेलची स्पर्धा हैद्राबाद येथे घेण्यात आली होती. या मध्ये संपूर्ण भारतातून अंतिम फेरीत तीन स्पर्धकांची निवड करण्यात आली त्यामध्ये अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावलेली वर्धेची सुप्रसिध्द गायिका सानिका बोभाटे हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आणि ऑल इंडिया लेव्हल चॅम्पियन स्पर्धेत भारतात द्वितीय क्रमांक पटकाविला. सानिका बोभाटे हिला ७५,००० रुपये रोख व चषक पुरस्कार प्राप्त झाला. या प्रसंगी हैदराबादचे नववे निझाम,आयोजक अघा मुझफ्फरुद्दीन, शाह एहसान शान,उस्ताद नजमुद्दीन जावेद यांची प्रमुख उपस्थिती होती.सानिका बजाज इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ला शिकत असून ती स्वरदायिनी म्युझिक अकॅडमी मध्ये केतकी कुलकर्णी यांच्या कडून संगीताचे शिक्षण घेत आहे . तिने यापूर्वीही इंडिया लेव्हलच्या अनेक स्पर्धा जिंकल्या असून वर्धा कला महोत्सवाच्या गायन स्पर्धेत सतत अव्वल ठरली आहे. तसेच सुरश्री ऑल् इंडिया लेव्हल स्पर्धेत ती भारतात टॉपर राहली आहे. यादे रफी स्पर्धेत, सुर संगम स्पर्धेत ती प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई, वडील व गुरू केतकी कुलकर्णी यांना दिले आहे.तिच्या यशा बद्दल वर्धेचे आमदार डॉ.पंकज भोयर, वर्धा कला महोत्सवाचे अध्यक्ष संदीप चिचाटे, लायन्स क्लबचे संचालक अनिल नरेडी, दिलीप रोकडे, अध्यक्ष आशिष पोहाने ,जीवन बांगडे ,सुरमनी वसंत जळीत , केतकी कुलकर्णी ,यशवंत कुमार पलेरीया, किरण पट्टेवार व संगीत क्षेत्रातील विविध मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले आहे.

गजानन जिकार साहसिक न्यूज -/24 तुळजापूर,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!