हिंगणघाटच्या वना नदीजवळ आई व मुलाचा अपघात होऊन जागीच मृत्यू….

0

हिंगणघाट-/ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 येथील वना नदी पुलाजवळ आज शनिवारी सायंकाळीं झालेल्या भीषण अपघातात वर्धा येथील रहिवासी असलेल्या वाघमारे कुटुंबीयातील मुलाचा व आईचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला.वर्धा येथे मोटर सायकलआईला घेऊन जात असताना वना नदी पुला जवळ बेंगलोर येथे जाण्यासाठी भरधाव वेगाने निघालेल्या भारत बेंझ कंपनीच्या ट्रॅव्हलस क्रमांक HR 38 AV.5937 ने होंडा लिवो मोटर सायकलला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला, यात आरती केवलदास वाघमारे वय 42 वर्ष रा. फुलफैल वर्धा तसेच अक्षय केवलदास वाघमारे वय 24 राहणार पुलफैल वर्धा या आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.

ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज -/24 हिंगणघाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!